गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मुंबई, ठाण्यासह राज्यात दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. अनेक ठिकाणी दहीहंडीसाठी लाखो रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी विविध पथकांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. एकीकडे जल्लोषाचे वातावरण असताना दुसरीकडे काही गोविंदांच्या जखमी होण्याचे वृत्तही समोर आले आहे. उंच थरावरुन कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत आतापर्यंत १५ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत दुपारी १२ वाजेपर्यंत विविध पथकातील १५ गोविंदा जखमी झाल्याची माहिती आहे. या सर्व गोविंदांवर महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. यात मुंबईतील केईएम रुग्णालयात एक, नायर रुग्णालयात चार, सायन रुग्णालयात दोन, सेंट जॉर्ज हॉस्पिटलध्ये एक, पोद्दारमध्ये चार, राजावाडीमध्ये एक, एमटी अगरवाल रुग्णालयात एक आणि कुर्ला भाभा रुग्णालयात एका गोविंदावर उपचार सुरू आहेत. सध्या या सर्व गोविंदांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
दरवर्षी दहीहंडी फोडताना गोविंदा जखमी होण्याच्या घटना घडत असतात याचं पार्श्वभूमीवर गोविंदांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील महानगरपालिकेची रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. महानगरपालिकेची केईएम, शीव, नायर आणि कूपर ही रुग्णालये सज्ज झाली आहेत.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदींवर टिप्पणी करणाऱ्या सपा नेता हाजी रझाच्या तीन मजली इमारतीवर बुलडोजर !
एक लाखाहून अधिक गोविंदांना विम्याचे सुरक्षा कवच
दोन लाख श्रीगणेश निघाले परदेशाला
अयोध्येत ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपी सलमानच्या मुसक्या आवळल्या !
मुंबई आणि ठाण्यात जवळपास १३५४ दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. आहेत. तसेच गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या गोविंदा पथकाला २५ लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे.