डहाणू नगरपालिकेच्या वतीने डहाणू महोत्सवाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या महोत्सवाच्या निमित्ताने स्थानिकांना आर्थिक हातभारही मिळाला. नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्या प्रयत्नांतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यासंदर्भात राजपूत म्हणाले की, डहाणू नगरपालिकेच्या माध्यमातून हा डहाणू फेस्टिव्हल केला. लोकांकडे रोजगार नव्हता. कोरोना काळात. महोत्सवाच्या माध्यमातून आर्थिक मदत कशी मिळेल स्थानिकाना याचा विचार करून हा महोत्सव केला गेला. २ लाख लोकांनी या महोत्सवाला भेट दिली. या महोत्सवाला प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर, स्थानिक आमदार, खासदार, जिल्हाधिकारीही उपस्थित होते.
राजपूत यांनी सांगितले, विविध प्रकारचे २०० स्टॉल या महोत्सवात लावण्यात आले होते. जळगाव, पुणे, गुजरातमधून आलेल्या लोकांनी स्टॉल लावले होते. स्टेजवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वॉटर स्पोर्ट्सचे आयोजन करण्यात आले होते. पॅरा मोटर्स कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर शो, मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. हॉर्सरायडिंगची स्पर्धाही होती. डहाणूसाठी ही खूप मोठई गोष्ट होती. प्रथमच डहाणूत असा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
या स्टॉल लावणाऱ्यांना याचा आर्थिक फायदा झाला. शहरातील हॉटेल्सनाही यानिमित्ताने दोन दिवस फायदा झाला. दरवर्षी असा महोत्सव करण्याची आमची इच्छा आहे, असेही राजपूत म्हणाले.
हे ही वाचा:
पेनड्राइव्ह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे न दिल्यामुळे भाजपाचा सभात्याग
समाजकार्यामुळे सफाई कामगार झाला भाजपाचा आमदार!
फडणवीसांनी फोडला दुसरा बॉम्ब! ‘न्यूज डंका’ च्या हाती एक्सक्ल्युझिव्ह ध्वनिफीत
काश्मीर फाइल्स आणि गंडवणारा प्रपोगंडा
महोत्सवासाठी उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकरही उपस्थित होते. उद्घाटन समारंभानंतर त्यांनी महोत्सवातील दुकानांना, कार्यालयांना भेटी दिल्या. यावेळी बोलताना प्रशांत कारुळकर म्हणाले की, या महोत्सवामुळे मला २५ वर्षे मागे जायची संधी मिळाली. महोत्सवाचे आयोजन हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असल्याचे दिसले. त्याबद्दल नगराध्यक्ष भरत राजपूत यांचे अभिनंदन.