जुन्या जमान्यातल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना २०२२ सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. यापूर्वी आशा पारेख यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
३० सप्टेंबरला आशा पारेख यांनी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख या अभिनय क्षेत्रात सक्रिय नसल्या तरी त्यांचा व्यवसायाचा व्याप मोठा आहे. तसेच त्या टी.व्ही कार्यक्रमात परिक्षक म्हणून हजेरी लावताना दिसतात. विशेष म्हणजे, आशा पारेख यांचं कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिकृत अकाउंट नाही. त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आवडत नाही. वयाच्या ७९ व्या वर्षी सोशल मीडिया जॉइन करुन त्रास होईल असे कुठलेच नवीन प्रयोग आपल्याला करायचे नाहीत असे मत आशा पारेख यांचं आहे.
हे ही वाचा:
आठ राज्यांमध्ये NIA कडून PFI वर कारवाई
१० युट्यूब वाहिन्यांवरील ४५ व्हिडीओ हटवण्याचे केंद्र सरकारचे निर्देश
भुजबळ म्हणतात, सरस्वतीची नको, सावित्रीची पूजा करा
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून मुख्यमंत्री अशोक गेहलोत बॅकफूटवर?
आशा पारेख यांनी ‘दिल देके देखो’, ‘कटी पतंग’, ‘तीसरी मंझिल’ आणि ‘कारवां’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक अभिनेत्री मानली जाते. यापूर्वी २०१९ चा दादासाहेब फाळके पुरस्कार साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांना देण्यात आला होता. आशा पारेख यांनी १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘कोरा कागज’ दिग्दर्शित केली. निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांचं काम अभूतपूर्व आहे.