जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली. मिथुन चक्रवर्ती यांना ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील मिथुन चक्रवर्ती यांच्या योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येत असल्याचे निवड समितीने म्हटले आहे.
चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च असणारा दादासाहेब फाळके पुरस्कार हा अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ८ ऑक्टोबर रोजी देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीटकरत म्हटले, मिथुन दा यांचा उल्लेखनीय सिनेमॅटिक प्रवास पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील मिथुन चक्रवर्ती यांच्या महान योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके निवड समितीने दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
हे ही वाचा :
हरियाणा काँग्रेसकडून आणखी १० नेत्यांची हकालपट्टी
कानपूरमध्ये पुन्हा ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर सापडला ‘अग्निसुरक्षा सिलेंडर’
सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर येण्याचा मार्ग मोकळा; नासाची टीम अंतराळात पोहोचली
इस्रायलने बेरूतमध्ये केलेल्या हल्ल्यात चार जण ठार
दरम्यान, दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मिथुन चक्रवती यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माझ्याकडे बोलण्यासाठी कोणतीच भाषा नाहीये, मी हसूही शकत नाही आणि आनंदाने रडूही शकत नाही. खालून वर संघर्ष करत आलेल्या एका मुलाला एवढा मोठा सन्मान दिला जात आहे, ही माझासाठी मोठी गोष्ट आहे. हा पुरस्कार मी माझ्या कुटुंबाला आणि चाहत्यांना समर्पित करतो, असे अभिनेते मिथुन चक्रवर्ती म्हणाले.
मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये ३५० हून अधिक सिनेमांमध्ये काम केले असून त्यांनी निर्मिती क्षेत्रातही काम केले आहे. तसेच सध्या मिथुन चक्रवर्ती राजकारणात विशेष सक्रिय आहेत. याशिवाय त्यांनी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले असून दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कारही जिंकला आहे.