32 C
Mumbai
Thursday, December 12, 2024
घरविशेषदादरचे 'कुर्ला' नको म्हणून...

दादरचे ‘कुर्ला’ नको म्हणून…

न्यूज डंकाचा आवाज; दादरमध्ये कुर्ल्याची पुनरावृत्ती नको म्हणून रस्ते केले मोकळे

Google News Follow

Related

कुर्ला बस अपघातात सात जणांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर बसचालक संजय मोरे याला अटकही करण्यात आली. त्यानंतर अशा दाटीवाटी असलेल्या त्या धावणाऱ्या बसेसची उदारहणं समोर येऊ लागली. असेच एक दाटीवाटी असलेले ठिकाण म्हणजे दादर. दादरमध्ये कधीही जा तोबा गर्दी पाहायला मिळते. या गर्दीतूनच वाट काढत दादर स्थानकात a-११८ या क्रमाकांची बस येत असते. दुर्दैवाने कुर्ला येथे घडलेली घटना दादरमध्ये घडली तर मोठी दुर्घटना घडू शकते.

या घटनेचे गांभीर्य ओळखून ‘न्यूज डंकाने’ ११ डिसेंबरच्या ‘न्यूज डंका महाराष्ट्र’च्या अंकात त्याचे फोटो छापून येथील परिस्थितीचे गांभीर्य दाखवून दिले. या घटनेचे फोटो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महानगर पालिकेला एक्स या हॅडलवर टॅग केले होते. त्यानंतर त्याची तात्काल दखल घेऊन कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई तात्पुरती नसावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. सणवार असताना इथे प्रचंड गर्दी असते पण एरव्ही लोकांना चालायला, बससाठी जागा का नसते असा प्रश्न लोक विचारत आहेत.

दादर आणि गर्दी हे एक समीकरण मानलं जातं. दादर मध्ये अनेक जण खरेदीसाठी आणि कामाधंद्यासाठी जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दादरहून वरळी गाव येथून a-११८ ही एसी बस कबुतर खाना येथील गर्दीतून वाट काढत रेल्वे स्थानकात थांबते. ही बस कामत हॉटेलच्या निमुळत्या गल्लीत घालून मग रिव्हर्स घेतली जाते. बस रिव्हर्स ज्या ठिकाणाहून घेतली जाते, त्याच ठिकाणी बसची रांग आणि मोठ्या प्रमाणात फेरीवाले आणि ठेलेवाले आपले बस्तान मांडून असतात. महत्त्वाचे म्हणजे ही बस स्टेनशकडे जात असताना दोन्ही बाजूला असंख्य फेरीवाले बसलेले असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना थेट रस्त्यावरूनच चालल्याशिवाय पर्याय राहत नाही. एखाद दिवशी कुर्ला येथे झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती जर दादरमध्ये घडली तर मोठा अनर्थ होऊ शकतो. याकडे गांभीर्याने पाहिले जाणार का, असा प्रश्न न्यूज डंकाने उपस्थित केला होता. त्यानंतर तात्काळ कुर्ला येथील घटनेचे गांभीर्य ओळखून दादरमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे.

हेही वाचा:

मंत्री मंडळात कोणताही तिढा नाही, फॉर्मुला ठरलाय, लवकरच कळेल

पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात असलेल्या दोघांना भिवंडी, अमरावतीमधून घेतले ताब्यात

जैश-ए-मोहम्मदशी संबंधित प्रकरणी एनआयएकडून पाच राज्यात १९ ठिकाणी छापेमारी

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
212,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा