मुंबईकरांची वाढती लोकसंख्या यामुळे सार्वजनिक वाहतूक मार्गावर येणार ताण लक्षात घेता. गर्दी नियोजनासाठी मध्य रेल्वेने कंबर कसलेली दिसून येते. मुंबई मेट्रो आणि नवी मुंबई रेल्वस्थानकाच्या आधारावर प्रमुख रेल्वे स्थानकाचा फलाटावरील गर्दी नियोजनासाठी मध्य रेल्वेने गर्दीचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी मध्यरेल्वेने दादर, ठाणे आणि कल्याण स्थानकातील फलाटावरील स्टॉल हटविण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या नवनिर्वाचित (डीआरएम) रजनिश गोयल यांनी ठाणे स्थानकाची पाहणी केली असता. त्यावेळी होणाऱ्या गर्दीचे प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि फलाटावरील गर्दी कमी करण्याच्या नियोजनाचे अंदाज घेऊन, ठाणे फलाट क्रमांक ५ आणि ६ वरील स्टॉल हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासोबत कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक ४ आणि ५, तसेच दादर स्थानकातील फलाट ४ वरील स्टॉल हटविण्याचे आदेश देण्यात आले आहे.
तसेच मध्यरेल्वेच्या या स्थानकावरील लोकल तसेच मेल-एक्सप्रेसच्या प्रवाशांची गर्दी पाहता हे नियोजन करण्याचे ठरले आहे. शिवाय या गर्दीचा रेल्वेवाहतुकीवर कोणताही परिणाम न होता. प्रवाशांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी दोन टप्प्यात हे काम केले जाणार आहे. तसेच सध्या मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे आणखी १० दिवस सर्वेक्षण सुरू असणार आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर स्टॉलधारकांना इतरत्र नेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
हे ही वाचा:
मनसे पुण्यात ३५०० ‘अॅम्बेसेडर’ नेमणार
ब्रिजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, मनसे विरोध करणार?
पावाचे वाढले ‘भाव’ देवा आता धाव
दिलासा नाहीच, संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी वाढली
या स्टॉलधारकांना पर्यायी जागा देण्याच्या सुचना रेल्वने केल्या आहेत तसेच पहिल्या टप्प्यात ठाणे स्थानकातील एका फलाटावरील हा उपाय राबविण्यात येणार आहे तर उर्वरित स्थानकानवर हा फेब्रुवारी २०२३ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नंतर दादर आणि कल्याण स्थानाकांतील फलाटावरील गर्दी नियोजानासाठी उपक्रम हाती घेण्यात येईल. असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.