दादरमध्ये भूमिपुत्र फेरीवाल्यांच्या पोटावर पाय देऊन मुस्लिम बांगलादेशी रोहिंग्यांनी आपले पाय रोवलेत. या मुस्लिम फेरीवाल्यांचे वरदहस्त जमाल आणि शमसुद्दीन यांच्या कारनाम्याची पोलखोल भाजपाच्या पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांनी केली. पालिका आणि या दोघांचे साटेलोटे असल्यावरून त्या धडक बीएमसीच्या वड्याळ्याच्या डेपोत धडकून त्यांनी शमसुद्दीनची यथेच्छ पिटाई केली. या आंदोलनाची मोठ्या प्रमाणात फेरीवाले आणि दादरकर यांच्यात चर्चा रंगताना दिसली आणि संतापही.
दादरमध्ये हे मुस्लिम बांगलादेशी फेरीवाले महिलांची छेडछाड आणि टिंगळटवाळीही करतात. फेरीवाल्यांचे हप्ते, कोणत्या जागेवर बसायचे, हे मुस्लिम बांगलादेशी फेरीवाल्यांची राहण्या-खाण्याची सोय कुठे केली जाते, कुठवर यांचे जाळे परसरलेत याचीही पोलखोल अक्षता यांनी केली. न्यूज डंकाने याची दखल घेऊन त्यावर व्हिडिओ आणि बातमी केली. या ‘बांगलादेशी हटाव दादर बचाव धरणे आंदोलन’ आज दादरमध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली झाले. यावेळी या यंत्रणेचा सूत्रधार जमाल याला अटक करण्याची मागणीही करण्यात आली. या आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दादरकर मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याला समर्थन दिले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बांगलादेशमधून घुसखोरी करणाऱ्या मुस्लिमांविरोधात कारवाई झालीच पाहिजे. दादरमध्ये घुसखोरी करून या मुस्लिमांनी दादागिरी करून जागा बळकावल्या आहेत. पैसे इथे कमवायचे आणि हा पैसा भारताविरु्ध कारवाई करण्यासाठी वापराचा, हे भारतीय जनता पक्षाला मान्य नाही, असे आशिष शेलार यावेळी म्हणाले.
आमचं दादर, प्रभादेवी, माहीम म्हणणारे शेपूट घालून बिळात लपलेत. बाहेर पडत नाहीयेत. केवळ भाषण देतील, गर्जना करतील याचं आश्चर्य वाटतं. आमची मुंबई म्हणणारे ज्यांचं कधीही भाषण झाले की ‘मी मर्द’ आहे. नाही विचारले तरी मर्द म्हणणारे कुठे गेलेत. मग बांगलादेशी घुसखोरांविरोधात तुमची मर्दानगी गेली कुठे, असा टोला आशीष शेलार यांनी लगावला. दादर, मुंबईच्या माध्यमातून हा विषयाला वाचा फोडण्यात आली. मुंबईला वाचवायची गरज आहे. मुंबईमध्ये मोठं संकट डोक्यावर आलेलं आहे. मुंबईकरांचे प्रश्न बाजूला पडलेत. अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सरकार होते. मर्दाची भाषा करणारे तुम्ही होतात, पण काम काय केलंत. जमाल, शमसुद्दीन हा काही काल नाही बसला. महापालिकेमध्ये सत्ता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची होती. तेव्हा का नाही कारवाई केलीत. आता ही कारवाई भारतीय जनता पार्टी करेल. दादर तो झांकी है, पूरी मुंबई में कारवाई अभी बाकी है, अशी गर्जनाही यावेळी देण्यात आली.
हे ही वाचा:
शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात
सानिया मिर्झाचा टेनिसला अलविदा
घुसखोर मुस्लिम फेरीवाल्यांविरोधात अक्षता तेंडुलकर यांनी पोलिसांची भेट घेतली. पोलिसांना विनंती केली आहे की, अनधिकृत जागा ज्यांनी बळकावल्यात, बांगलादेशी घुसखोरांना मदत करताहेत त्यांच्यावर कारवाई करा. कारवाई बांगलादेशींवर करायला सांगितली, तर त्यांनी सगळ्यांवर कारवाई केली. कारवाई स्थानिक भूमिपुत्रांवर केली. जे स्थानिक वर्षानुवर्षे ज्या जागेवर धंदा करतात त्यांना जागा मिळालीच पाहिजे, ही सुद्धा मागणी यावेळी करण्यात आली.
संपूर्ण मुंबईत ज्या ठिकाणी बांगलादेशी मुस्लिम घुसखोर आले असतील. स्थानिकांच्या जागा बळकावत असतील, तर आजपासून संपूर्ण मुंबईत त्यांना हाकलून लावू. यायचं त्यांनी आडवं यावं. खुल्लं आवाहन आहे. पोलिस प्रशासन आणि मुबई प्रशासनाला अजून शमसुद्दीन कुठे असतील तर शोधा. तर, मग जर तुम्ही शोधलं नाहीत तुमच्या हाताने, तर अक्षताताई प्रसाद देईल तिच्या हाताने. ही परिस्थिती यायची नसेल तर तुम्ही कामाला लागा, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.