30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषगणेशोत्सवासाठी दादर गजबजले

गणेशोत्सवासाठी दादर गजबजले

मखर, कंठी, फुले घेण्यासाठी गर्दी

Google News Follow

Related

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वांचा लाडक्या बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशभक्त आपल्या देवाचे स्वागत दणक्यात व्हावे, यासाठी मोठ्या प्रमाणात बाजारात जाऊन खरेदी करत आहेत. बाप्पाचे आगमन मोठ्या दणक्यात करण्यासाठी सजावटीसाठी मंडप, फुले, हार, वेगवेगळे साहित्य कुठे मिळते, याचा शोध घेत आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सध्या दादरमध्ये गर्दी होतानाचे चित्र दिसत आहे.

याच दादरमध्ये सध्या गर्दी पाहावयास मिळत आहे. कारण ही तसेच आहे. आपल्या लाडक्या बापाचे आगमन अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यासाठी दादरमध्ये खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग पाहावयास मिळते.

गणपतीसाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी गणेशभक्त दादर पिंजून काढून वस्तू खरेदी करत आहेत. दादरमध्ये गणपतीसाठी लागणारे मंडप अगदी ७०० रुपयांपासून सुरू होऊन तुमच्या बजेटनुसार अगदी २०,००० हजार पर्यंत तुम्हाला इथे खरेदी करता येऊ शकतात. गणपतीच्या डेकोरेशनसाठी दादरची प्रसिद्ध आयडियलची गल्ली म्हणजे छबीलदास शाळेची गल्ली पालथी घातली जात आहे. येथे पडदे, मखर, फुले, फ्लॉवरपॉट्स, उंदीरमामा, हार, गणपतीला हव्या त्या वस्तू माफक दरात खरेदी करता येतील.

हेही वाचा :

गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी

संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय

उद्धवजी दंगली कोण घडवतायत ते जरा बघा

गणेशोत्सवासाठी दादर गजबजले

पडदे अगदी १५० रुपयांपासून ते ४५० रुपयांपर्यंत तर फ्लॉवरपॉट्स १०० रुपयांपासून ५५० रुपयांपर्यंत येथे मिळत आहेत. गणपतीसाठी लागणारी कंठी, मुकुट, हार, उंदीरमामा, दागिने, गणपतीचे अलंकार यांच्या किमतीची सुरुवात ५० रुपयांपासून आहे. कापडी फुलं ६० रुपये डझनापासून तर लटकन १५० ते २५० रुपयांपर्यंत तुम्हाला इथे मिळू शकतील.

गणपतीच्या फुलांच्या डेकोरेशनचा पट्टा ८०० रुपयांपासून तुम्हाला परवडेल अशा किमतीत येथे तुम्हाला मिळू शकेल. पडद्याचे विविध प्रकार इथे उपलब्ध आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा