25 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषम्हणून बायबल हाती धरण्यास दादाभाई नौरोजींनी दिला होता नकार

म्हणून बायबल हाती धरण्यास दादाभाई नौरोजींनी दिला होता नकार

ब्रिटिश संसदेतील पहिले ‘भारतीय’ खासदार होते दादाभाई नौरोजी

Google News Follow

Related

परदेशात एखादी भारतीय वंशाची व्यक्ती महत्त्वाच्या पदावर विराजमान झाली की, आपल्याला अभिमान वाटतो. सध्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सूनक यांच्या निवडीची चर्चा सुरू आहे. पण ब्रिटनच्या संसदेत सर्वात प्रथम भारतीय वंशाची आणि आशियातील पहिली व्यक्ती खासदार ठरली, ती म्हणजे दादाभाई नौरोजी. ४ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस. यानिमित्त त्यांच्या देदिप्यमान कारकीर्दीवर टाकलेला प्रकाश.

भारताचे वयोवृद्ध पुरुष (grand old man of india) म्हणून ज्यांना ओळखले जाते, ते दादाभाई नौरोजी हे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील एक आद्य स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांनी ब्रिटिश संसदेत खासदार म्हणून स्थान मिळविल्यानंतर त्याची स्तुती भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांनीही केली. जर ब्रिटिश संसदेत २० कोटी भारतीयांपैकी एका भारतीयाची निवड करायची झाली असती तर दादाभाई नौरोजी यांच्याव्यतिरिक्त आणखी कुणाचे नाव विचारात घेतले गेले नसते, असे टिळक म्हणाले होते. यावरून नौरोजी यांची त्या काळातील ख्याती लक्षात येते.

दादाभाई नौरोजी हे स्वतःच्या धर्माबद्दल प्रचंड आदर बाळगणारे होते. खासदार बनल्यानंतर ब्रिटिश संसदेत शपथ घेताना त्यांना बायबल हातात धरणे अनिवार्य होते. पण त्यांनी बायबल हाती धरून शपथ घेण्यास नकार दिला कारण ते जन्माने पारशी होते. तेव्हा त्यांना खोरदे अवेस्ता या झोराष्ट्रीयन धार्मिक ग्रंथाच्या आधारे शपथ घेण्याची परवानगी देण्यात आली.

दादाभाई हे प्रखर देशभक्त होते. भारताची स्थिती सुधारण्यासाठी आणि भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी ब्रिटिश संसदेत संपूर्ण वेळ भारतीयांची बाजू मांडली.

हे ही वाचा:

शहेनशाह जहाँ बैठते है, दरबार वही लग जाते है…

पोलीसाच्या मित्रानेच सोनाराला लुटले…

‘केरळमध्ये काम करण्यासाठी देशभक्तीबरोबरच बलिदान आणि शौर्यही हवे’

‘शबाना, नसीरुद्दीन स्लीपर सेल एजंट’

आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या दादाभाईंचा जन्म ४ सप्टेंबर १८२५ ला पारशी कुटुंबात झाला. १८५२मध्ये त्यांनी भारतातील पहिली राजकीय संघटना स्थापन केली जिचे नाव बॉम्बे असोसिएशन असे होते. मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांची गणित आणि नैसर्गिक तत्त्वज्ञान शिकविण्यासाठी प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. इंग्रजांचाय या कॉलेजमध्ये शिकवणारे ते पहिले भारतीय होते. १८५६मध्ये ते कामा अँड कंपनीच्या वतीने इंग्लंडला गेले तिथे लंडनमध्ये ते प्राध्यापक बनले. पण हे करून ते थांबले नाहीत तर भारतीय तरुणांची एकजूट करण्यासाठी आणि भारतीय समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांनी लंडन इंडियन सोसायटीची स्थापना केली. युरोपातील देशांमधील अर्थव्यवस्थेचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आणि १८९२मध्ये ते हाऊस ऑफ कॉमन्सचे सदस्यही बनले. त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले. त्यातील गरिबी आणि भारतातील ब्रिटिशांकडून अनपेक्षित असलेली सत्ता या नावाने पुस्तकही लिहिले. (पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया). या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी भारताचे ब्रिटिशांकडून झालेले आर्थिक शोषण, त्याची कारणे, त्यावरील उपाय यांचे सखोल विश्लेषण केले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते आणि १८८६, १८९३ आणि १९०६मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्षही बनले. १८७४मध्ये ते बडोद्याचे पंतप्रधान बनले. त्याशिवा बॉम्बे विधानपरिषदेचे सदस्यही बनले. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी ते सर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या इंडियन नॅशनल असोसिएशनचे सदस्यही होते. पण नंतर काँग्रेस आणि ही संघटना यांचे विलिनीकरण झाले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले आणि मोहनदास करमचंद गांधी यांचे ते प्रमुख मार्गदर्शकही होते. मुंबईत त्यांच्या स्मरणार्थ रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे तर पाकिस्तानातील कराचीतही त्यांच्या नावाने रस्ता आहे. लंडनमध्ये फिन्सबरी येथेही त्यांच्या नावाचा मार्ग आहे.  ३० जून १९१७ ला त्यांचा मुंबईत मृत्यू झाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा