25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषसौरव दादाने सांगितली रोहित शर्माच्या कर्णधार पदामागाची रंजक गोष्ट

सौरव दादाने सांगितली रोहित शर्माच्या कर्णधार पदामागाची रंजक गोष्ट

रोहित शर्माला नको होती कर्णधारपदाची जबाबदारी

Google News Follow

Related

भारतीय संघाने विश्वचषक २०२३ स्पर्धेमध्ये आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण स्पर्धेत दबदबा निर्माण केला आहे. भारतीय संघाने लीग टप्प्यापासून आतापर्यंत आठ सामने खेळले असून ते सर्व सामने जिंकले आहेत. शिवाय भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. सेमीफायनलसाठी भारतीय संघ पात्र ठरला असून एक लीग मॅच भारतीय संघाची बाकी आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या या अभूतपूर्व कामगिरीचे श्रेय कर्णधार रोहित शर्माला जाते. त्याच्या उत्तम कर्णधारपदाच्या शैलीमुळे भारतीय संघ आज अव्वल आहे. जगभरातून रोहित शर्माचे कौतुक होत असताना त्याच्या कर्णधार पदाबद्दल एक रंजक गोष्ट चर्चेत आली आहे. ही गोष्ट म्हणजे एक वेळ अशी आली होती की, रोहित शर्माला भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी नको होती.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरभ गांगुली यांनी कोलकाता टीव्ही चॅनलवर याचा खुलासा केला. जेव्हा ते बीसीसीआयचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या मते विराट कोहलीनंतर रोहित शर्मा संघाची कमान सांभाळणारा सर्वोत्तम खेळाडू होता. या कारणास्तव गांगुली यांनी रोहितला कर्णधारपद स्वीकारण्याची विनंती केली होती. परंतु, रोहित तेव्हा भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारण्यास तयार नव्हता, कारण तो प्रत्येक फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवत असल्याने प्रचंड ताणामुळे रोहितला कर्णधारपदी राहण्यात रस नव्हता, पण सौरभ गांगुली यांनी त्याची मनधरणी केली.

हे ही वाचा: 

वरुणराजाची राजधानी दिल्लीवर कृपा! AQI पातळी ४०० वरून १०० वर

‘भिवंडीतील पडघा हे गाव सीरियासारखे! शरियाचे होते पालन…’

बेस्ट, एसटी, पालिका कर्मचाऱ्यांची झाली दिवाळी गोड!

घरकाम करणाऱ्या बाईच्या बेपत्ता मुलीसाठी सनी लिओनी धावून आली!

गांगुली यांनी सांगितले की, “मी त्याला सांगितले की तुला हो म्हणावे लागेल, अन्यथा मी हो म्हणेन.” गांगुली रोहितला समजावताना म्हणाले की, बघ, मला माहित आहे की तुझ्यावर ओझं आहे. अनेक सामन्यांमध्ये आणि आयपीएलमध्ये कर्णधारपद, पण तरीही टीम इंडियाच्या कर्णधारपदापेक्षा मोठं काही नाही.” गांगुली यांच्या म्हणण्यानुसार, खूप समजावून सांगितल्यानंतर रोहित शर्माने टीम इंडियाचं कर्णधारपद स्वीकारलं आणि आज त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे. ते पुढे म्हणाले की, ‘मला सुरुवातीपासूनच माहित होते की, विराट कोहलीनंतर सध्या संघामध्ये रोजित हाचं खेळाडू कर्णधारपदापेक्षा चांगला पर्याय नाही. त्यामुळे विश्वचषकात भारतीय संघाची उत्कृष्ट कामगिरी पाहून मला अजिबात आश्चर्य वाटत नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा