ड्रग्ज प्रकरणात बदनामी केल्याप्रकरणी दादा भुसे यांची सुषमा अंधारे यांना नोटीस!

आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा, मंत्री दादा भुसे

ड्रग्ज प्रकरणात बदनामी केल्याप्रकरणी दादा भुसे यांची सुषमा अंधारे यांना नोटीस!

मंत्री दादा भुसे यांचा संबंध ड्रग्स माफिया ललित पाटीलशी असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता.या प्रकरणी मंत्री दादा भुसे यांच्याकडून सुषमा अंधारेंना नोटीस पाठवण्यात आली आहे.ड्रग्स प्रकरणी बदनामी केल्याप्रकरणी दादा भुसेंच्या वकीलांमार्फत अंधारेंना नोटीस पाठवण्यात आली आहे.याअगोदर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत याना देखील भुसेंकडून नोटीस पाठवण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत दादा भुसेंसह शंभूराज देसाई यांचा नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणात हात असल्याचे सांगितले होते. त्यांच्या चौकशीसह नार्को टेस्ट करा असेही सांगण्यात आले होते, त्यानंतर दादा भुसे यांनी प्रत्युत्तर देताना आपला कोणताही संबंध नाही. काय चौकशी करायची ती करा, आमची तयारी असल्याचे ते म्हणाले होते.त्यानंतर पुन्हा संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्याकडे बोट दाखवत नाशिक च्या ड्रग्ज प्रकरणात हात असल्याचा गंभीर आरोप केला होता.

हे ही वाचा:

चॅटजीपीटीने लिहिलं काही क्षणात गाणं; बँडने केला लाईव्ह परफॉर्मन्स

भारताचे माजी फिरकीपटू बिशनसिंह बेदी यांचे निधन!

तृणमूल पक्षाचे महुआ मोइत्रा यांच्यावर कारवाईचे संकेत

११ वर्षांनंतर पुन्हा तेच उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा

त्यामुळे दादा भुसे यांनी हे आरोप धुडकावून लावत संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले होते. तर दुसऱ्या एका प्रकरणात संजय राऊत यांनी बदनामी केली म्हणून दादा भुसे यांनी मालेगाव कोर्टात खटला दाखल केला होता. त्या संदर्भात कोर्टाची नोटीस पाठवण्यात आली होती. आता ड्रग्ज प्रकरणात दादा भुसे यांचे नाव घेतल्यामुळे सुषमा अंधारे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणात बदनामी केल्याप्रकरणी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागा, असा नोटीसीत उल्लेख करण्यात आला आहे. तसेच नोटीसीला उत्तर न दिल्यास मानहानीचा दावा दाखल होणार असा इशारा देखील देण्यात आला आहे.

 

 

 

 

 

Exit mobile version