अपघाताच्या ५ सेकंद आधी कारचे ब्रेक लावले गेले असे सायरस मिस्त्री अपघाती मृत्यूच्या संदर्भातील मर्सिडीजच्या अंतरिम अहवालात म्हटले आहे. कारची तपासणी करण्यासाठी मर्सिडीज-बेंझचे तज्ज्ञांचे पथक हाँगकाँगहून सोमवारी मुंबईला येणार आहे.
लक्झरी कार निर्माता मर्सिडीज-बेंझने उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या जीवघेण्या अपघाताबाबतचा अंतरिम अहवाल पालघर पोलिसांना सादर केला आहे, ज्यात असे नमूद करण्यात आले आहे की, रस्ता दुभाजकाला धडकण्यापूर्वी वाहनाचे ब्रेक पाच सेकंद दाबले गेले होते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, कारची तपासणी करण्यासाठी मर्सिडीज-बेंझचे तज्ञांचे पथक हाँगकाँगहून सोमवारी मुंबईला येणार आहे.
पालघर जिल्ह्यात मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पांडोळे यांची मर्सिडीज कार रस्ता दुभाजकाला धडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. कारमधील इतर दोन प्रवासी, अनाहिता पांडोले (५५) आणि त्यांचे पती डॅरियस पांडोले (६०) अपघातात जखमी झाले होते. त्यांना मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . गुजरातहून मुंबईला जात असताना सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला होता.”मर्सिडीज-बेंझने आपला अंतरिम अहवाल पोलिसांना सादर केला आहे.
अपघातापूर्वी काही सेकंद आधी ताशी १०० किमी वेगाने गाडी धावत होती आणि ती जेव्हा पुलाच्या डिव्हायडरला आदळली तेव्हा तिचा वेग ताशी ८९ किमी होता, असे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
हे ही वाचा:
७० वर्षांच्या काळात १८ भारतीय पंतप्रधानांना भेटल्या राणी एलिझाबेथ
अबब!! एलिझाबेथ यांची इतकी संपत्ती मिळणार वारसांना
याकुबच्या कबरीच्या सौंदर्यीकरणाला वक्फ बोर्डाचा पाठिंबा?
गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या… दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप
अपघाताच्या पाच सेकंद आधी कारचे ब्रेक लावले होते, असे अहवालात म्हटले आहे. पाटील म्हणाले की, प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही आपला अहवाल सादर केला होता. अपघातानंतर कारमधील तीन ड्रायव्हरच्या सीटवर आणि एक शेजारच्या सीटवर चार एअर बॅग उघडल्या होत्या असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.