राजस्थानमध्ये लग्न समारंभात मोठी दुर्घटना घडली आहे. गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत लग्नाच्या वरातीत सहभागी होण्यासाठी आलेले ६० हून अधिक जण होरपळले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
राजस्थानमधील भुंगरा येथील रहिवासी सगतसिंग गोगादेव यांच्या मुलाचे गुरुवारी लग्न होणार होते. यातील वऱ्हाडीमंडळी गावातून वरात काढण्यासाठी एकत्र जमले होते. तिथं जेवणापूर्वी गॅस गळतीमुळं स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, घराचं छतही कोसळले. सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत महिला आणि लहान मुलांसह उपस्थित ६० हून अधिक लोक होरपळले. त्यानंतर जखमींना तात्काळ महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या दुर्घटनेत ६३ जण होरपळले आहेत. तर यामध्ये दहाहून अधिक जण गंभीर भाजले आहेत. तसेच चार जणांचा मृत्यू झाला आहे. गंभीर भाजलेल्या ५१ जणांना जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान दोन निष्पापांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा :
भिवंडीत सराईत गुंड गणेश कोकाटेवर अज्ञात गुंडाचा गोळीबार
मुलानेच ७० वर्षीय आईची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, पण
हॉटेलमध्ये शिजला कापड व्यवसायिकाच्या हत्येचा कट
नाशिककरांची ८ तारीख ठरली ‘अपघाताची’
या दुर्घटनेतची माहिती मिळताच जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता, ग्रामीण एसपी अनिल कयाल शेरगडच्या भुंगरा गावात पोहोचले. त्यानंतर जोधपूरला पोहोचल्यानंतर त्यांनी सर्व भाजलेल्या लोकांची विचारपूस केली. अधिकाऱ्याने दोन सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती दिली आहे.