‘रेमल चक्रीवादळ’ हे पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हे चक्रीवादळ निर्माण झालं आहे.हे चक्रीवादळ ताशी १३० ते १३५ किमी वेगाने किनाऱ्यावर धडकणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.हवामान विभागाने बंगाल आणि ओडिशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अनेक भागात पावसाला सुरुवात देखील झाली आहे.दरम्यान, सरकार आणि प्रशासन सतर्क मोडवर आहेत. पश्चिम बंगालसह ओडिशामध्ये एनडीआरएफच्या १२ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हे वादळ येत्या काही तासांत तीव्र चक्री वादळात रूपांतरित होईल आणि २६ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर हे वादळ पोहोचेल. ‘रेमल’ चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळ २१ तासांसाठी बंद करण्यात आला आहे.तसेच ट्रेन देखील बंद करण्यात आल्या आहेत. ओदिशा आणि प. बंगाल अशा दोन राज्यांना या वादळाचा फटका बसणार असल्याने ८ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून सर्व आपात्कालिन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
हे ही वाचा:
योगी आदित्यनाथ एकेकाची मस्ती उतरवण्यात वाकबगार आहेत!
‘मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी इंडी आघाडी संविधान बदलणार’
डोंबिवली स्फोटप्रकरणातील शोध थांबला, तीन कामगार अद्याप बेपत्ता!
शिक्षिकेचा आवाज काढून सात विद्यार्थिनींवर बलात्कार
या चक्रीवादळासाठी ‘रेमल’ हे नाव ओमानने सुचवले आहे.याचा अरेबिक भाषेत अर्थ ‘वाळू किंवा रेती’ असा होतो.भारतीय हवामान विभागाने सांगितले की, या चक्रीवादळ रेमलचे केंद्र खेपुपारापासून सुमारे ३६० किमी दक्षिण-दक्षिणपूर्व आणि सागर द्वीपच्या ३५० किमी दक्षिण-पूर्वेस आहे. वादळाची तीव्रता आणखी तीव्र होऊन त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.