अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. येत्या ५ दिवसांत कदाचित या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात होऊ शकते अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसे झाल्यास २०२१ मधील हे पहिले चक्रीवादळ ठरणार आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार १४ मे पर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. या पट्ट्याचे रुपांतर १६ मे पर्यंत चक्रीवादळात होऊ शकेल. हे वादळ शक्यतो उत्तर अथवा वायव्येस सरकण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
सचिन वझेची अखेर पोलिस दलातून हकालपट्टी
मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? फडणवीसांचा सवाल
अनिल देशमुखांची मुलेही ईडीच्या रडारवर?
मुख्यमंत्री महोदय, २ मिनिटांत २ परस्पर विरोधी भूमिका कशा मांडता?
या वादळाचे नाव ताऊक्ताई असे ठेवण्यात आले आहे. जर हे वादळ भारतीय किनाऱ्यावर आदळले तर ते २०२१ मधील पहिले वादळ ठरणार आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेशी सामना करणाऱ्या देशासाठी ही नक्कीच मोठी आपत्ती ठरू शकते. वादळामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊन जाईल. भारताचे साक्लॉन मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहपात्रा यांनी आत्ताच हे वादळ नेमका कोणता मार्ग घेईल याचा अंदाज बांधणं अवघड असल्याचे सांगितले आहे. भारतीय हवामान खाते या कमी दाबाच्या पट्ट्यावर लक्ष ठेवून असून, त्यानुसार ते पुढील सुचना जारी करतील.
मागील वर्षी मे महिन्यात दोन वादळांनी भारताच्या दोन्ही किनारपट्ट्यांवर धडक दिली होती. अम्फन हे बंगालच्या उपसागरातून आले होते, तर निसर्ग हे वादळ अरबी समुद्रातून आले होते.