मुंबईतही सुरू होणार सायकल शेअरिंग

मुंबईतही सुरू होणार सायकल शेअरिंग

मुंबई मेट्रोच्या जागृती नगर स्थानकात सायकल शेअरिंग सुरू करण्यात आले होते. आता ही पध्दत लवकरच इतर स्थानकांतही सुरू करण्यात येईल. मुंबई मेट्रोच्या वर्सोवा- घाटकोपर या पहिल्या मार्गिकेच्या जागृती नगर स्थानक येथे सायकल शेअरिंग पध्दत फेब्रुवारी २०२० मध्ये ‘माय बाईक’ या कंपनीतर्फे चालू करण्यात आली होती. 

या चळवळीला वाढता प्रतिसाद पाहून आता ही सेवा इतर स्थानकांसाठी देखील सुरू करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या के वॉर्डकडून याबाबत १६ डिसेंबर २०२० रोजी एक पत्र प्रसिध्द करण्यात आले होते. त्यानुसार प्रवाशांना आत जागृती नगर स्थानकासोबतच आझाद नगर, डी.एन. नगर आणि वर्सोवा या स्थानकांवर देखील या सेवेचा लाभ घेता येईल. जागृती नगर येथे सायकल सेवा देणारी कंपनीच या ३ स्थानकांसाठी सेवा देईल. मात्र त्यासाठी या कंपनीला काही कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे आवश्यक आहे. यापैकी एक म्हणजे वाहतूक पोलिसांची परवानगी घेणे अनिवार्य आहे. 

माय बाईक कंपनीचे संस्थापक अरजित सोनी यांनी सांगितल्यानुसार, आम्ही अजून वाहतूक पोलिसांकडून परवानगी मिळण्याची वाट बघत आहोत. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता होऊन आम्ही १५ जानेवारी २०२० पासून आमच्या सेवेला प्रारंभ करू शकू अशी आशा आहे. या सर्व ठिकाणी सुरूवात २० सायकल पासून होईल. पुढे वाढत्या मागणीनुसार सायकलची संख्या वाढवत नेली जाईल. 

सध्या अस्तित्वात असलेल्या सेवेसाठी प्रवासी ताशी ₹२ इतक्या कमी दराने सायकल भाड्याने घेऊ शकतात. याव्यतिरिक्त साप्ताहिक किंवा मासिक पासेस घेता येतात. साप्ताहिक पासचा दर ₹२८० इतका आहे तर मासिक पासचा दर ₹९०० इतका आहे.

Exit mobile version