अकबर महान नसून तो बलात्कारी होता असे वक्तव्य राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी केले आहे.कोटा दौऱ्यादरम्यान शालेय कार्यक्रमाला संबोधित करताना मंत्री मदन दिलावर यांनी हे वक्तव्य केले.मदन दिलावर यांनी अकबराच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले आणि विचारले की, तो महान कसा काय झाला? तो मीना बाजार चालवायचा आणि तेथून बहिणी-मुलींना उचलायचा. त्यांच्यासोबत अनैतिक कृत्ये करायचा, असे मदन दिलावर म्हणाले.
शिक्षणमंत्री मदन दिलावर म्हणाले की, मी अभ्यासक्रम बदलण्याच्या बाजूने नाही. परंतु, महापुरुषांना हिणवण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच काढून टाकल्या जातील.आता शाळांमधील अभ्यासक्रमातही बदल करण्यात येणार आहेत. ते पुढे म्हणाले की, एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात अकबरला महान म्हणून शिकवले गेले आहे. चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांनाही दहशतवादी घोषित करण्यात आले होते, तर तसे नाहीये.संपूर्ण अभ्यासक्रमाचा आढावा घेतला जाईल.जर पाठ्यपुस्तकांमध्ये कुठेही चुकीच्या पद्धतीने लिहिले गेले असेल तर त्याचा आढावा घेऊन काढून टाकण्याचा प्रयत्न करू, असे शिक्षणमंत्री मदन दिलावर म्हणाले.
हे ही वाचा:
सिद्धू मूसवालाची आई ५८ व्या वर्षी गरोदर
संदेशखलीचा आरोपी शाहजहान शेखला फाईव्ह स्टार सुविधा
अवैध खाण प्रकरणी अखिलेश यादव यांना सीबीआयकडून समन्स!
राजीव गांधींच्या मारेकऱ्याचा चेन्नईच्या रुग्णालयात मृत्यू!
ते पुढे म्हणाले की, अकबर हा दुष्कर्म करणारा होता, त्यामुळे तो महान कसा होऊ शकतो?.पण हे शिकवण्याचा प्रयत्न केला गेला.ज्या लोकांनी अकबराच्या महानतेबाबत लिहिले आहे ते लोक गुलामगिरीच्या मानसिकतेतले असतील.त्यामुळे या गुलामगिरीची मानसिकता असलेल्या लोकांनी अकबराच्या इतिहासाचा समावेश अभ्यासक्रमात केला असेल, असे शिक्षणमंत्री दिलावर म्हणाले.