विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर क्युबाच्या गुझमनची फायनलमध्ये एन्ट्री !

१०० ग्रॅम जास्त दिसून आल्यामुळे विनेशला केले होते अपात्र

विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर क्युबाच्या गुझमनची फायनलमध्ये एन्ट्री !

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आल्यानंतर आता त्याठिकाणी क्युबाच्या गुझमनला फायनलमध्ये एन्ट्री मिळाली आहे. विनेश फोगाटने सुरवातीपासूनच चांगली सुरुवात करत फायनलमध्ये मजल मारली होती. भारताला विनेशकडून पदकाची आशा होती. परंतु सामन्यापूर्वी विनेश फोगाटचे वजन केले असता १०० ग्रॅम जास्त दिसून आले आणि त्यानंतर तिला स्पर्धेतून बाद करण्यात आले.

विनेश फोगाटने मंगळवारी (६ ऑगस्ट) प्री-क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या वर्ल्ड चॅम्पियन युई सुसाकीचा ३-२ असा पराभव केला होता. यानंतर तिने उपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनियन कुस्तीपटू ओक्साना लिवाचचा पराभव केला. या विजयासह विनेशने उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत विनेशने क्युबाच्या गुझमन लोपेझचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. विशेष म्हणजे ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी विनेश ही पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली होती. दरम्यान, आता विनेश अपात्र ठरल्याने क्युबाच्या गुझमन लोपेझने अंतिम फेरीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे.

हे ही वाचा..

बांगलादेशमधील भारतीय उच्चायुक्तालयातील १९० कर्मचारी मायदेशी परतले

बांगलादेश हिंसाचार; हिंदू गायकाचे घर जाळले, ९७ ठिकाणी हिंदूंवर हल्ले !

बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतीय कांद्याला फटका, सीमेवर शेकडो ट्रक ठप्प !

“विनेश तू देशाची चॅम्पियन आणि अभिमान आहेस…” अपात्रतेनंतर पंतप्रधान मोदींनी केले सांत्वन

दरम्यान, स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याने अपात्रतेची कारवाई करण्यात आली. यामुळे आता सुवर्ण आणि रौप्य पदकाची संधी हुकलेली विनेश फोगाट रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही. विनेश फोगाट ही अपात्र ठरल्यानंतर त्याठिकाणी गुझमन लोपेझला फायनलमध्ये एन्ट्री मिळाली आहे.

Exit mobile version