जगातील सगळ्यात मोठी टी-२० क्रिकेट स्पर्धा आयपीएल मधील एक यशस्वी टीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स या संघात वाद सुरू असल्याच्या चर्चा जोर धरू लागली आहे. गेली अनेक वर्ष चेन्नई संघासोबत असलेला अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा व्यवस्थापन यांच्यात हा वाद असल्याची चर्चा आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून रवींद्र जडेजा याला अन फॉलो करण्यात आले. त्यामुळेच चेन्नईचा संघ आणि रवींद्र जडेजा यांच्यात सर्व काही मिळत नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आयपीएलच्या पुढील हंगामात जडेजा चेन्नई संघासोबत दिसणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हे ही वाचा:
मुंब्र्यात वसुली सरकार, पोलिसांनीच व्यापाऱ्याला लुटले
संभाजी राजेंच्या नव्या संघटनेची घोषणा
अल जझिराच्या महिला पत्रकाराचा गोळीबारात मृत्यू
शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन
टाटा आयपीएल २०२२ साठी चेन्नई सुपर किंग्स संघ गाणे रवींद्र जडेजाला सर्वाधिक म्हणजेच तब्बल १६ कोटी रुपयांची रक्कम मोजत संघात सामील करून घेतले होते. स्पर्धेचा हंगाम सुरू होण्याच्या काही दिवस आधी जडेजाला कर्णधार म्हणूनही घोषित करण्यात आले. पण जडेजा संघाला अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्याने कर्णधारपद सांभाळले असून त्यापैकी सहा सामने चेन्नई संघाने गमावले. तर जडेजा हा फलंदाजी आणि गोलंदाजीतही आपली जादू दाखवू शकला नाही.
त्यानंतर पुन्हा एकदा चेन्नई संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. १४ मे रोजी कलकत्ता विरुद्ध झालेल्या सामन्यात जडेजा जखमी झाला आणि आयपीएलच्या उर्वरित हंगामातून बाहेरही पडला. पण आता चेन्नई संघाकडून सोशल मीडियावर जडेजाला अनफॉलो करण्यात आल्यामुळे जडेजाच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या निर्णयाला खरे कारण काय आहे? याची चर्चा सुरू झाली आहे.