चेन्नईचा सुपर विजय

चेन्नईचा सुपर विजय

महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स संघाने सनराईजर्स हैदराबाद संघाचा ७ गडी राखून विजय मिळवला आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत विजयासाठी ठेवलेले १७२ धावांचे लक्ष्य चेन्नईने अगदी सहज पूर्ण केले.

दिल्लीतील फिरोज शाह कोटला मैदानात रंगलेल्या या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार डेव्हिड वाॅर्नर (५७) आणि मनीष पांडे (६१) यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर आणि नंतर केन विलीअमसन याने १० चेंडूत नाबाद २६ धावा केल्यामुळे हैदराबाद संघाने २० षटकांत ३ बाद १७१ धावा केल्या.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात आढळले ६३,३०९ नवे कोरोना रूग्ण

मोफत लशीची फक्त घोषणा, मग १ मेपासून लस का नाही?

लसीकरण केंद्रातील रांगांवर जालीम डोस कोणता?

मोफत लसीची घोषणा म्हणजे ठाकरे सरकारचे लबाडा घरचे आवताण…

१७२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात खेळायला उतरलेल्या चेन्नई संघाकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने अतिशय महत्वपूर्ण खेळी केली. त्याने ४४ चेंडूत ७५ धावा केल्या. फॅफ ड्युप्लेसीने ५६ धावा करत त्याला साथ दिली, तर हैदराबादकडून गोलंदाजी करताना राशिद खानने तीन बळी घेतले. गायकवाड आणि ड्युप्लेसीच्या खेळींच्या जोरावर हैदराबादचे आव्हान चेन्नई संघाने अगदी लिलया पूर्ण केले आणि ७ गडी राखून विजय मिळवला. ऋतुराज गायकवाडच्या या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version