29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरविशेषचेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा अंतिम फेरीत

चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा अंतिम फेरीत

Google News Follow

Related

चेन्नई सुपर किंग्सचा संघ पुन्हा एकदा आयपीएलच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा ४ गडी राखून पराभव करत चेन्नईने आयपीएल २०२१ च्या अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. या सामन्याची कोणती खास बाब ठरली असेल तर ती म्हणजे चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा आपल्या फिनिशरच्या भूमिकेत दिसून आला. त्यामुळे जगभरातील क्रिकेट रसिकांसाठी हा सामना चांगलीच मनोरंजनाची पर्वणी ठरला.

रविवार 10 ऑक्टोबर रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये पहिला क्वालिफायर सामना रंगलेला पाहायला मिळाला. चेन्नई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजी करायला उतरलेल्या दिल्ली संघाने पृथ्वी शॉ, ऋषभ पंत आणि शेमरन हेटमायर यांच्या फटकेबाजीच्या जोरावर धावफलकावर १७२ धावां चढवल्या. पृथ्वी शॉ (६०) आणि ऋषभ पंत (नाबाद ५१) या दोघांनी अर्धशतकी खेळी केली तर. हेटमायरने महत्त्वपूर्ण अशा ३७ धावा केल्या.

हे ही वाचा:

आरे वसाहतीत आता बिबट्यांपायी दुचाकीवरून फिरणेही मुश्कील

नवाब मलिकविरोधात १०० कोटींचा दावा करणार मोहित कंबोज

आशिष मिश्रा एसआयटीसमोर; आता वास्तव येईल समोर

आरीफ मोहम्मद खान म्हणतात, अल्पसंख्य ही संकल्पनाच मान्य नाही, मी भारतीय आहे!

१७३ धावांचे विजयी लक्ष्य साध्य करायला मैदानात उतरलेल्या चेन्नई संघाचा पहिल्याच षटकात एक गडी बाद झाला. पण सलामीवीर ऋतुराज गायकवाड (७०) आणि रॉबिन उथप्पा (६३) यांनी शतकी भागीदारी करत चेन्नईचा डाव सावरला. तर अखेरच्या काही षटकांमध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने फटकेबाजी करत चेन्नई संघाला पुन्हा एकदा अंतिम फेरीत नेले. धोनीने ६ चेंडूत नाबाद १८ धावा केल्या.

आज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेता संघ दिल्ली संघासावबत दुसरा क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे. तर त्या सामन्यात जो संघ विजयी होईल तो संघ चेन्नई सोबत अंतिम सामना खेळणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा