24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषजम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये चकमक, सीआरपीएफचा अधिकारी हुतात्मा !

जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये चकमक, सीआरपीएफचा अधिकारी हुतात्मा !

सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरु

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे समोर आले आहे. या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) अधिकारी हुतात्मा झाले आहेत. उधमपूरच्या दुडू तहसीलच्या चिल भागात दहशतवाद्यांशी ही चकमक झाली. डीआयजी मोहम्मद भट यांनी सांगितले की, रविवारी (१९ ऑगस्ट) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सुरक्षा दल गस्त घालत होते आणि यादरम्यान सुरक्षा दलाचा दहशतवाद्यांशी सामना झाला. यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. यामध्ये सीआरपीएफच्या अधिकाऱ्याला वीरमरण आले .

कुलदीप सिंग असे हुतात्मा झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते सीआरपीएफमध्ये निरीक्षक पदावर कार्यरत होते. कुलदीप सिंग हे हरियाणाचे रहिवासी होते. जेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार केला तेव्हा सीआरपीएफसह एसओजी आणि स्थानिक पोलिस कर्मचारी गस्ती पथकात सामील होते. दरम्यान, दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरु केली आहे.

हे ही वाचा :

चांदीवलीत कट्टरपंथीकडून तीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार !

लाडक्या बहिणींचे आशीर्वाद फळणार का?

ममता बॅनर्जींची ठोकशाही, विरोधात पोस्ट करणाऱ्या विद्यार्थीनीला अटक !

कोलकाता बलात्कारित तरुणीच्या शवविच्छेदन अहवालातून आले भयानक सत्य समोर

 

हुतात्मा झालेले कुलदीप सिंग हे सीआरपीएफच्या १८७ व्या बटालियनमध्ये इन्स्पेक्टर होते. सीआरपीएफची तुकडी गस्तीवर असताना ही घटना घडली. मक्याच्या शेतात लपलेल्या दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत कुलदीप सिंह यांना गोळी लागली होती. उपचार करण्यासाठी रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आणि त्यांचा खात्मा करण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा