मणिपूरच्या जिरीबाममध्ये दहशतवादी हल्ला, एक जवान हुतात्मा !

हल्ल्यात तीन जवान जखमी

मणिपूरच्या जिरीबाममध्ये दहशतवादी हल्ला, एक जवान हुतात्मा !

मणिपूरच्या जिरीबाममध्ये रविवारी सशस्त्र हल्लेखोरांनी सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात एका केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाला वीर मरण प्राप्त झाले आहे. या दहशतवादी हल्ल्यात तीन जवानही जखमी झाले आहेत.

सकाळी ९.४० च्या सुमारास हा हल्ला झाला. सीआरपीएफ आणि मणिपूर पोलिसांच्या पथकाला अज्ञात सशस्त्र लोकांनी लक्ष्य केल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी (१३ जुलै) झालेल्या गोळीबाराच्या घटनेशी संबंधित शोध मोहिमेसाठी संयुक्त सुरक्षा दल मोनबुंग गावाजवळ येत असताना ही घटना घडली. या दुर्घटनेत एक जवान हुतात्मा झाला. अजय कुमार झा असे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव असून जवान बिहारमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. तसेच तीन जखमी जवानांमध्ये जिरीबाम पोलिस स्टेशनमधील एका उपनिरीक्षकाचा (एसआय) समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, जिरीबाम भागात अलीकडे हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत.

हे ही वाचा:

काँग्रेस नेत्याने पसरवली खोटी बातमी

आजारी म्हणून जामीन मिळवलेले लालूप्रसाद यादव अंबानींच्या लग्नसमारंभात ठणठणीत

कॅन्सरग्रस्त अंशुमान गायकवाड यांना बीसीसीआयकडून १ कोटी !

तब्बल ४६ वर्षानंतर जगन्नाथ पुरी मंदिराचा खजिना उघडला !

 

दरम्यान, मणिपूर पोलिसांनी इम्फाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्यांमध्ये दारूगोळ्यासह एक AK-५६ रायफल, एक सेल्फ-लोडिंग रायफल (SLR), एक स्थानिक SLR, अनेक पिस्तूल, हँडग्रेनेड आणि २५ राऊंड्सचा समावेश आहे. इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील खुयाथोंग आणि नागमापाल भागात एका शोध मोहिमेदरम्यान शुक्रवारी एक एक्सकॅलिबर रायफल, ७.६२ मिमी एआर, आणि एक MA-३ MK-II रायफल जप्त केली आहे.

Exit mobile version