जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणारी एक गाडी सिंध नाल्यात कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात रविवारी ही घटना घडल्याची माहिती आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवानांना घेऊन जाणारं एक वाहन सिंध नाल्यात कोसळल्याने ८ जवान जखमी झाले आहे. सर्व जखमींना बाहेर काढण्यात आले असून बालटाल बेस कॅम्प रुग्णालयात नेण्यात आलेय.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफ जवानांची गाडी जम्मूमधील नाला सिंधमध्ये कोसळल्याने हा अपघात घडला. निलगिरी हेलिपॅडजवळ रविवारी सकाळी सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणारे (क्रमांक HR36AB/3110) वाहन सिंध नदीत कोसळल्यानं अपघात झाला आहे. यामध्ये सुरेंद्र शर्मा, धारा सिंह, जीवन सिंह, कृष्ण कुमार, वासुदेव, पींटू कुमार, रछपाल, राकेश, राजवीर, अनिल कुमार, मंजीत कुमार, राजेश कुमार, योगराज, रूप सिंह, हनीम सिंह व धन्य संजय असे ८ जवान जखमी झाले आहेत. त्यांना बालटालच्या बेस कॅम्प रुग्णालयात आणण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हे ही वाचा:
मोमो खाण्याच्या पैजेनंतर तरुणाचा मृत्यू
शुभमन गिलला झुकते माप का दिले जात आहे?
टोमॅटो विकून एका महिन्यात कमावले कोटी
बांद्रा बँडस्टँड येथे भरतीच्या लाटेने नेले महिलेला ओढून
हा अपघात घडला तेव्हा सीआरपीएफचे जवान बालटाल मार्गे अमरनाथ गुहेकडे जात होते. सध्या पवित्र अमरनाथ यात्रा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर यात्रेवरील दहशतवादाचा धोका पाहता प्रशासनाकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अमरनाथ यात्रा अधिक सुरक्षित करण्यासाठी मोठ्या संख्येने सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी ही पाऊले उचलण्यात आली आहेत.