लोकसभेच्या निवडणुकीला आज पासून सुरुवात झाली आहे.आज पहिल्या टप्प्यातील १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होणार आहे.अशातच पश्चिम बंगालमधील माथाभंगा येथे गुरुवारी(१८ एप्रिल) रात्री केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) जवान एका मतदान केंद्राच्या शौचालयात मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील माथाभंगा येथे निवडणूक ड्युटीवर तैनात असलेला सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला आहे.जवान मतदान केंद्राच्या शौचालयात मृतावस्थेत आढळून आला.जवानाला तातडीने रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.गुरुवारी ही घटना घडली.रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानाच्या डोक्याला जखमा झाल्या आहेत.
हे ही वाचा:
मोदींच्या तिसऱ्या पर्वात एक-दोन वर्षांत नक्षलवादाचा नायनाट करू
पट्टा-काठीने मारहाण, तोंडात फेव्हीकॉल, जखमांवर मीठ…महिलेवर अत्याचार, लव्ह जिहादचा संशय
इराणने जप्त केलेल्या इस्रायली जहाजावरील भारतीय डेक कॅडेट सुखरूप परतली मायदेशी
पक्षांना निधी पुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय निधीचा पर्याय
या प्रकरणातील प्राथमिक माहितीनुसार, सीआरपीएफ जवान हा बाथरूममध्ये पडला होता, त्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती.त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा.दरम्यान, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण अस्पष्ट होईल असे सांगण्यात येत आहे.