कोविडचा सामना सध्या संपूर्ण जग करत आहे. त्याविरूद्ध भारतात देखील लसीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे. महाराष्ट्रात मात्र सातत्याने लस नसल्याचा कांगावा केला जातो. मात्र याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी उत्तर देताना लसींच्या उपलब्धतेचे तपशिल प्रसिद्ध केले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी लसीकरणाचे आकडे मांडले आहेत. त्यानुसार आत्तापर्यंत सुमारे ५३.२४ कोटी लसी देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर ७२,४०,२५० इतक्या लसी लवकरच राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मिळणार आहेत. या संपूर्ण पुरवठ्यापैकी एकूण ५१,५६,११,०३५ इतक्या लसी वापरल्या गेल्या आहेत. यामध्ये वाया गेलेल्या लसींचाही समावेश आहे. मनसुख मांडविय यांनी दिलेली आकडेवारी ही सकाळी ८ वाजता उपलब्ध होणारी आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकवले
भारत-इंग्लंड दुसरा कसोटी सामना आजपासून
अश्विनी उपाध्याय यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत
भारतात येणार चार नव्या हवाई कंपन्या?
या व्यतिरिक्त त्यांनी अजून शिल्लक असलेल्या लसींची आकडेवारी देखील त्यांनी समोर ठेवली आहे. त्यामध्ये सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून २.२५ कोटी लसी शिल्लक असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्याव्यतिरिक्त न वापरलेल्या लसी राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशांच्या खासगी रुग्णालयांमध्ये वापरासाठी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतातील लसीकरणामध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींचा वापर केला जात आहे. त्याबरोबरच स्पुतनिक लसीला देखील मान्यता देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त जॉन्सन अँड जॉन्सन लसीला देखील मान्यता दिली गेली आहे. त्यामुळे देशातील एकूण उपलब्ध लसींच्या संख्येत वाढ होणार आहे.