२१ जुलैला महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं, आजही चिपळूण अजून सावरलं नाही. झालेल्या नुकसानीमुळे चिपळूणकरांचे कंबरडे मोडले आहे.
चिपळूणमध्ये तेरा ते सोळा फूट पाणी होते. दरड कोसळल्यानेही सार्वजनिक मालमत्तांचे मोठे नुकसान झालेले आहे. सध्याच्या घडीला प्रशासनाच्या अंदाजे रत्नागिरीमध्ये ४०० कोटींचे नुकसान झालेले आहे. सरकाकडून अजूनही कुठल्या मदतीची घोषणा मात्र झालेली नाही. पंचनामे पूर्ण करण्याचे काम सध्या जवळपास ९० टक्के झालेले आहे.
जवळपास या पुराचा फटका २४ हजार मालमत्तांना झालेला आहे. या पुरामध्ये सर्वाधिक नुकसान चिपळूणचे झालेले आहे. सध्याच्या घडीला २७ निवारा केंद्रात १ हजार १२५ नागरिक आहेत. तसेच आता पुढची भीती आहे ती साथीच्या रोगांची. त्यामुळेच आर्थिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळीवरील लढाया आता चिपळूणकरांना लढाव्या लागणार आहेत.
रत्नागिरीतील चिपळूण, खेड आणि इतर अनेक शहरे आणि शेजारील रायगडचा काही भाग गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या पुराचा त्रास सहन करावा लागला. या भागातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहिल्या आणि शहरात येऊन स्थिरावल्या. रस्त्यांना पडलेल्या भेगा, तसेच वाहून गेलेले पूल यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटलेला आहे. रस्ते पूल साकव वाहून गेल्यामुळे जिल्हा परिषदेचे मोठे नुकसान झाले आहे.
हे ही वाचा:
कोर्ट म्हणाले, त्या मुलांची फी परत करा!!
वाहनांच्या आता इथेही वाढल्या रांगा
पीव्ही सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक
…असा मिळाला सचिनला त्याचा नवा पार्टनर!
सध्या बहुतेक बाधित भागात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली असली तरी, पूरामुळे घर संसार वाहून गेला आहे. जे काही वाचले ते गाळातून काढण्याचे काम सध्या सुरु आहे. खेड आणि महाड शहरांनाही पुराचा चांगलाच तडाखा बसला.