उबाठा नेत्याच्या डोक्यावर महाराजांचे जिरेटोप कसे चालतात ?

भाजप आमदार नितेश राणेंकडून सुनील राऊतांचा फोटो ट्विट

उबाठा नेत्याच्या डोक्यावर महाराजांचे जिरेटोप कसे चालतात ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसी येथून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान मोदींच्या डोक्यावर जिरेटोप चढवला होता.या घटनेनंतर विरोधकांनी प्रफुल पटेल आणि भाजपवर टीका केली होती.दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी उबाठा गटाचे नेते सुनील राऊत यांचा एक फोटो ट्विट केला आहे.यावर विरोधकांनी बोलून दाखवण्याचे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

मंगळवारी (१४ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसी मधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला.त्यावेळी त्यांच्या सोबत एनडीए आघाडीतील मुख्य नेते उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्रातून मुख्यमंत्री शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल हे उपस्थित होते.पंतप्रधान मोदींनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सर्व नेत्यांनी त्यांचा एक-एक करून सत्कार केला.या दरम्यान प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान मोदींच्या डोक्यावर जिरेटोप चढवला.यानंतर प्रफुल पटेल यांच्यावर राज्यातील विरोधकांनी टीका केली.उबाठा गट, काँग्रेसचे विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून टीका करण्यात आली.

हे ही वाचा:

संदेशखालीतील आरोपी शहाजहानच्या निकटवर्तीयांची १४ कोटींची मालमत्ता जप्त

‘मीडियातले पत्रकार स्वतःच्या विचारसरणीचा प्रचार करत आहेत!’

“उद्धव ठाकरे जे पांचट जोक, टोमणे मारतात, ते शोभणारे नाही!”

कोकण रेल्वे आता बोरिवलीवरून सुटणार

विरोधकांच्या टीकेला उत्तर देत प्रफुल पटेल यांनी एक ट्विटकरत लिहिले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ, असे पटेल यांनी म्हटलं.

दरम्यान, विरोधकांच्या टीकेनंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उबाठा गटाचे नेते सुनील राऊत यांचा एक जिरेटोप घातलेला फोटो ट्विट केला आहे.या फोटोमध्ये सुनील राऊत यांच्या डोक्यावर जिरेटोप घातलेली दिसत आहे. तसेच त्यांच्या समोर एक व्यक्ती त्यांना हातात तलवार देत असल्याचे देखील दिसत आहे.या फोटोवरून नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले की, औरंग्याच्या पिल्लावळ च्या डोक्यावर महाराजांचे जिरेटोप कसे चालणार ? आता बोला.., असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version