‘राहुल गांधीच्या जिंकण्यासाठी प्रचंड थापा, पण हाती माती अन तोंडही झाले काळे’

भाजप आमदार अतुल भातखळकर यांची टीका

‘राहुल गांधीच्या जिंकण्यासाठी प्रचंड थापा, पण हाती माती अन तोंडही झाले काळे’

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा धुव्वा उडवला आहे. भाजपने ४८ जागांवर विजय मिळवत तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या वाटचालीवर आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेसने जोरदार प्रचार केला, मात्र ३७ जागांवरच त्यांना समाधान मानावे लागले. यावरून भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधीनी जिंकण्यासाठी प्रचंड थापा मारल्या, पण हाती फक्त माती लागली आणि तोंडही काळे झाल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. तसेच लोकांना प्रत्येकवेळी मूर्ख बनवता येत नाही, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे. 

निकालाच्या दोन दिवसांपूर्वी हरियानात काँग्रेसची सत्ता येईल आणि भाजप हद्दपार होईल अशी बतावणी काँग्रेसचे नेते करत होते. तसे चित्रही निर्माण केले गेले होते, मात्र निकालानंतर विरोधकांचे पितळ उघडे पडले. काँग्रेसच्या महिला प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी तर कहरच केला होता. हरियाणामध्ये भाजपने केवळ २० जागांवर विजय मिळवून दाखवावा स्वतःचे नाव बदलेन, असे सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले होते. पण २० तर लांबची बात, बहुमताचा ४६ चा आकडा पार करत भाजपने ४८ जागांवर विजय मिळविला. तर काँग्रेसला ३७, आयएनडीला २ आणि इतरला ३ जागा मिळाल्या.

निवडणुकीच्या निकालावरून काँग्रेसचा ढोंगी पणा, फेक नरेटिव्ह, अतिशयोक्तीच्या गोष्टी सर्व उघड झाल्या. यावरूनच भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकाकरत निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर ट्वीटकरत म्हणाले, जिंकण्यासाठी जेवढ्या थापा मारता येतील त्या सगळ्या थापा राहुल गांधी यांनी हरियाणात मारुन पाहील्या, परंतु तरीही हाती माती लागली. तोंडही काळे झाले. लोकांना प्रत्येकवेळी मूर्ख बनवता येत नाही. मतदारांनी भाजपाला अधिक शक्तिशाली आणि मजबूत बनवले, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

जीएसटी फसवणूक प्रकरणात ज्येष्ठ पत्रकार महेश लांगा यांना अटक

‘बटेंगे तो कटेंगे’ याचं गांभीर्य समजलं, सनातनींनी योग्य निर्णय घेतला!

पुन्हा शिक्कामोर्तब झाले, मुस्लीम मतं हिच काँग्रेसच्या विजयाची हमी…

वडील, काकांना दहशतवाद्यांनी मारले, पण शगुनने विजय मिळवून दिला रोखठोक संदेश!

Exit mobile version