सोसायटीत लसीकरण करणार, पण कसे?

सोसायटीत लसीकरण करणार, पण कसे?

लसीकरणाच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेनं मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेसाठी मुंबईकरांना काही अडचणींचा सामना करावा लागत होता. लसीकरण केंद्रावरील गर्दी, लसींच्या तुटवड्याअभावी लांबलेल्या लसीकरणाच्या तारखा अशा अडचणींवर तोडगा म्हणून पालिकेनं मुंबईकरांना एक चांगला पर्याय दिला आहे. ज्याअंतर्गत मुंबईकरांना लसीकरण केंद्रावर जाण्याचीही गरज लागणार नाही. सोसायटीत लसीकरणाला परवानगी दिली असली तरी ते आव्हानात्मकही असेल. यामध्ये केवळ ज्या सोसायट्यांमध्ये मोठे सभागृह आहेत आणि मोकळी जागा आहे अशाच सोसायट्यांना मान्यता मिळणार आहे. छोट्या सोसायट्यांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून हे निकष लावले गेले आहेत.

येत्या काही दिवसांमध्ये मुंबईतील सोसायट्यांमध्येच कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करुन दिली जाण्याची शक्यता आहे. यासाठी पालिकेकडून सोसाट्यांना रितसर परवानगीही मिळू शकते. मुंबई महापालिकेनं शहरातील मोठ्या सोसायट्यांना खासगी रुग्णालयासोबत करार करुन लसीकरण मोहिम राबवण्याची परवानगी दिली आहे.

हे ही वाचा:

सत्ताधारी पक्ष ते प्रमुख विरोधी पक्षही नाही, काँग्रेसची अधोगती सुरूच…

मे महिन्याच्या अखेरपर्यंत दुसरी लाट ओसरेल- विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग

मोदी सरकारचा मोठा निर्णय, ८० कोटी नागरिकांना मिळणार मोफत धान्य

आता व्हॉट्सऍपवर शोध जवळचे लसीकरण केंद्र

पालिकेनं ही परवानगी दिली असली तरीही सरसकट सर्व सोसायटींना यासाठीची परवानगी नसेल. ज्या सोसायटींना मोठं सभागृह आहे, जिथं लसीकरण प्रक्रियेदरम्यान गर्दी होणार नाही, लसीकरणासाठी ज्या सोसायटींमध्ये पुरेशी यंत्रणा आहे अशाच सोसासटींना पालिकेडून परवानगी देण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला शहरातील खासगी लसीकरण केंद्रावर लसी उपलब्ध नाहीत. त्यामुळं आता सोसायट्यांमध्ये लसीकरण मोहिम सुरु करायची झाल्यास ती केव्हा सुरु होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version