भाईचा बड्डे…पोलीस स्टेशनमध्ये साजरा

भाईचा बड्डे…पोलीस स्टेशनमध्ये साजरा

मुंबईतील जोगेश्वरी पोलीस स्टेशनमधील एक धक्कादायक प्रकार सध्या सोशल मिडीआयवर व्हायरल झाला आहे. जिथे एका कुख्यात गुंडाचा वाढदिवस साक्षात पोलीस अधिकारीच साजरा करताना दिसत आहेत. तर त्यासोबत त्याला केकही भरवत आहेत.

गेला काही काळ महाराष्ट्रातील पोलीस खाते हे काहीना काही चुकीच्या कारणाने चर्चेत राहिली आहे त्यातही परमवीर सिंग वाजे यांसारख्या प्रकरणांमुळे मुंबई पोलिसांची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे पण तरीही मुंबईतील पोलीस खात्यातील अजब प्रकार हे समोर यायचे काही थांबताना दिसत नाहीये. अशाच एका ताज्या प्रकारात स्वतः पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारीच एका सराईत गुन्हेगारा बरोबर त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत.

जोगेश्वरी पोलीस स्टेशनमध्ये हा प्रकार घडला आहे. पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र नेर्लेकर यांनी कुख्यात गुंड दानिश इष्टीखार सय्यद याच्या सोबत केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला सोशल मीडियावर ह्या धक्कादायक बर्थडे पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा:

वेबसाईट हँग; दहावीची मुले त्रासली

रस्त्यावरील टोमॅटोंमुळे वाहतूक खोळंबली तब्बल ५ तास

दहावीचा निकाल ९९.९५ टक्के; मग ७५८ मुलांचे काय झाले?

उद्धव ठाकरेंना ‘बेस्ट सीएम’ ठरवण्यामागे काँग्रेसचा हात?

दानिश इष्टीखार सय्यदहा सध्या जामिनावर बाहेर असून त्याच्यावर गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न करणे, प्राणघातक हत्याराचा वापर करून दंगा करणे, घातक हत्यारांनी दुखापत पोहोचवणे, तसेच शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, अशा विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर जोगेश्वरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्याला तलवार घेऊन फिरतानाही पाहण्यात आले आहे. तर त्या संबंधीची तक्रारही पोलीस स्थानकात दाखल आहे.

भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी हा व्हिडीओ ट्विटर वर टाकत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “ठाकरे सरकारचा राज्यात गुन्हेगाराचा वाढदिवस जोगेश्वरी पोलीस स्टेशन मध्ये साजरा केला जातो, क्राईम ब्रांच वसुलीचे काम करतात, मुंबई पोलिस मनसुख हीरण चा हत्येची सुपारी घेते, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्त एकमेकांवर हप्ता घेण्याचा आरोप करतात, सचिन वाझे महिन्याला १०० कोटीची वसुली वाटप करतात” असा घणाघात सोमैय्या यांनी केला आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणातील पोलीस अधिकारी महेंद्र नेर्लेकर यांची बदली केली असून त्यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत.

Exit mobile version