पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये अलिकडेच हिंसाचार दिसून आला. या हिंसाचारात ३ जणांची हत्या झाली तर अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर भयभीत झालेले हिंदू घर सोडून अन्य ठिकाणी स्थलांतर होत आहेत. या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आणि मुर्शिदाबादमधील हिंसाचारासाठी त्यांच्यावर आरोप केले.
मंत्री अन्नपूर्णा देवी म्हणाल्या, ममता सरकारच्या संरक्षणाखाली गुन्हेगार फोफावत आहेत. मुर्शिदाबादमधील घटना अत्यंत दुःखद आणि लज्जास्पद आहे. राज्य सरकारच्या संरक्षणाखाली या घटना घडत आहेत. त्या पुढे म्हणाल्या, हिंदूंना तेथून पळून जाण्यास भाग पाडण्यात आले.
हे ही वाचा :
पाकिस्तानच्या गंगाजळीत ८ अब्ज डॉलर बांगलादेश मागतोय त्यातले ४ अब्ज!
हमासने गुडघे टेकले; युद्ध समाप्तीच्या बदल्यात उर्वरित सर्व बंधकांना मुक्त करण्याची तयारी
फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये गोळीबार; दोघांचा मृत्यू
उद्धव ठाकरेंची शिळ्या आमटीला नव्याने फोडणी!
मुर्शिदाबादमध्ये वक्फ विधेयकाविरोधात झालेल्या निदर्शना दरम्यान हिंसाचाराची घटना घडली होती. यादरम्यान, जातीय हिंसाचार उसळला, ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी झाले. यानंतर, मुस्लिमबहुल जिल्ह्यात पोलिस, रॅपिड अॅक्शन फोर्स आणि केंद्रीय दलांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वक्फ विधेयकावरून भाष्य करताना मंत्री अन्नपूर्णा देवी म्हणाल्या, बहुतेक मुस्लिम या निर्णयाचे स्वागत करत आहेत. पश्चिम बंगाल सरकार त्यांची दिशाभूल करत आहे आणि हिंदू समुदायाला लक्ष्य करण्यासाठी त्यांना चिथावत आहे. ममता बॅनर्जी सरकारच्या राजवटीत गुन्हेगार फोफावत आहेत. लोक घाबरले आहेत. दरम्यान, मुर्शिदाबादमधील बेघर झालेल्या लोकांनी आज (१८ एप्रिल) पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांची भेट घेतली. यादरम्यान, त्यांनी राज्यपालांना नोकरी आणि भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले.