श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. श्रद्धाची हत्या आफताब पूनावाला याने केली असल्याचे समोर आले. श्रद्धाची हत्या कशी झाली याची कथा टीव्हीवर प्रसारित झाली आहे. या खून प्रकरणाचे नाट्यीकरण सोनी टीव्हीवरील क्राइम पेट्रोल या मालिकेत दाखवण्यात आले आहे. या घटनेवर आधारित अहमदाबाद-पुणे मर्डर नावाची मालिका सोनी टीव्हीवर दाखवली गेली. ही मालिका प्रसारित होताच लोकांचा राग अनावर झाला आहे.
या मालिकेत आफताबचे नाव बदलल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. श्रद्धाचे तुकडे करणाऱ्या आफताबचे नामकरण मिहिर असे करण्यात आले आहे, तर श्रद्धा एना फर्नांडिस. मिहीर हा योग शिक्षक आहे. मिहीर आणि त्याचे कुटुंबीय हिंदू धर्माचे तर एनाला ख्रिश्चन धर्मीय दाखवले गेले आहे. मालिकेमध्ये हे दोघे मंदिरात लग्न करतात आणि पुण्यात शिफ्ट होतात. तर श्रद्धा आणि आफताब लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते आणि दोघेही दिल्लीला शिफ्ट झाले होते.
एपिसोडमध्ये दाखवण्यात आले आहे की लग्नानंतर मिहीर एनाशी भांडू लागतो. एके दिवशी भांडण झाल्यावर मिहीर एनाला मारतो आणि मृतदेह बाथरूममध्ये ठेवतो. यानंतर धारदार शस्त्राने मृतदेहाचे तुकडे करून पॉलिथिन पॅकेटमध्ये ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवतो. मूळात श्रद्धाची निर्घृण हत्या ज्या आफताबने केली तो मुस्लिम होता. आफताबला सोनीने मुस्लिम धर्मीय आहे, हे दाखवण्याचे धाडस केलेले नाही.
हेही वाचा :
मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय योग्य
अजितदादा आव्हाडांच्या पंगतीत बसले !
नितेश राणे यांनी शेअर केला सुशांत सिंगचा पोस्टमार्टेमचा ‘तो’ व्हिडीओ
साहजिकच हिंदू धर्माला टार्गेट केल्याबद्दल लोक आक्रमक झाले आहेत. सोनी टीव्हीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. या मालिकेनंतर हा शो वादाच्या भोवऱ्यात आला आहे. ट्विटरवर सोनी टीव्हीचा बहिष्काराचा ट्रेंड सुरू झालेला आहे. लोक ट्विटरवर आपला रोष व्यक्त करत आहेत. सोनी टीव्हीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. #BOYCOTTSonyTV ट्रेंडिंग सुरू झाला. या संपूर्ण हत्या प्रकरणाची पार्श्वभूमी बदलण्याचा उद्देश आणि हिंदूंबद्दल द्वेष पसरवणे आहे.
आफताब पूनावाला यांनी आपल्या लिव्ह इन पार्टनरची गळा दाबून हत्या केली. यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. खून प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली. श्रद्धाच्या हत्येच्या आरोपाखाली आफताब अजूनही तुरुंगात आहे.