सौरव गांगुली आता त्रिपुरा राज्याच्या पर्यटनाचा ‘कॅप्टन’

राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सौरव गांगुली आता त्रिपुरा राज्याच्या पर्यटनाचा ‘कॅप्टन’

भाजपशासित त्रिपुराने क्रिकेटपटू सौरव गांगुली यांना नवे पर्यटन ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. त्रिपुरा सरकारने मंगळवारी तशी घोषणा केली. भारताच्या या माजी कर्णधाराने मंगळवारी त्रिपुराचे पर्यटन मंत्री सुशांत चौधरी यांची कोलकाता येथील गांगुलीच्या निवासस्थानी बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

‘भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी त्रिपुरा पर्यटनाचे ब्रँड ऍम्बेसेडर होण्याचा आमचा प्रस्ताव स्वीकारला, ही अतिशय अभिमानाची बाब आहे. मी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मला विश्वास आहे की, गांगुली यांच्या सहभागामुळे राज्याच्या पर्यटन क्षेत्राला नक्कीच चालना मिळेल,’ असे त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा म्हणाले. राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे त्रिपुराचे पर्यटन मंत्री सुशांत चौधरी यांनी सांगितले.

हे ही वाचा:

‘आदित्य राजपूतबाबत चुकीच्या बातम्या देऊ नका!’

फेस-स्वॅपिंग तंत्रज्ञानाच्या आधारे मित्र असल्याची बतावणी करत लुटले पाच कोटी

निवडणूक लढवल्याबद्दल १० वर्षांपूर्वी नोकरीवरून काढलेल्या परिचारिकेला दिलासा

संसद भवनाच्या उद्घाटनाला स्थापित होणाऱ्या राजदंडावर ‘नंदी’ विराजमान

ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून त्यांच्यासारख्या मान्यवर व्यक्तीचा त्रिपुरातील पर्यटन क्षेत्राला खूप फायदा होईल, असा विश्वास पर्यटन मंत्री चौधरी यांनी व्यक्त केला आहे. ‘आमच्या त्रिपुरा राज्याच्या पर्यटनाला जगासमोर नेण्यासाठी भरपूर प्रोत्साहन आणि योग्य ब्रँडिंगची गरज आहे आणि त्यासाठी आम्हाला जगभरात ओळखला जाणारा लोकप्रिय ब्रँड अॅम्बेसेडर हवा आहे! त्रिपुराचे पर्यटन जगासमोर आणण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दादा सौरव गांगुली यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व कोण असू शकते?,’ असे ते म्हणाले.

. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुली यांनी हे पाऊल उचलल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या काही वर्षांत पश्चिम बंगाल सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव गांगुलीकडे आला नव्हता. अभिनेता शाहरुख खानला बंगालचा ब्रँड ऍम्बेसेडर बनवण्यात आले आहे. योगायोग असा की, गांगुली एकेकाळी शाहरुखच्या आयपीएलच्या कोलकाता संघाचा सदस्य होता.

Exit mobile version