२०२२ हे वर्ष संपत असताना दुःखद घटना समोर येताना पाहायला मिळत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांचे शुक्रवारी ३० डिसेंबरला निधन झाल्याच्या घटनेने देश शोकाकूल अवस्थेत असताना भारतीय संघातला क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली. त्यामुळे देशवासियांना धक्का बसला आहे.
देहरादून येथे हा अपघात झाला. त्यात ऋषभ पंत गंभीर जखमी आहे. रुरकी येथे परतत असताना गुरुकुल नारसन येथे ही घटना घडली. त्याच्या कारचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेता हा अपघात मोठा होता, हे लक्षात येते. ऋषभला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या डोक्याला, पाठीला, पायाला जबर मार बसल्याचे फोटो यानिमित्ताने व्हायरल होत आहेत.
हे ही वाचा:
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांचे निधन
निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे?
आमच्याशी निर्दयीपणे कसे काय वागू शकता? उद्धव ठाकरे हताश!
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीसांची जय्यत तयारी
२५ वर्षीय ऋषभ याची कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकली आणि त्यात त्याला जबर मार बसला. या अपघाताने त्याच्या कारला आगही लागली. ऋषभ पंतला गंभीर जखमा झालेल्या आहेत, असे डॉक्टरांनी म्हटले असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाईल असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. सध्या त्याला दिल्लीतील रुग्णालयात आणण्यात आले आहे.
भारतीय संघ आता जानेवारी महिन्यात श्रीलंकेशी झुंजणार आहे. त्यात प्रारंभी टी-२० मालिका होणार आहे नंतर वनडे मालिकाही होईल. या दोन्ही मालिकांमधून ऋषभ पंतला वगळण्यात आले आहे. त्याला वगळण्यामागील कारण मात्र कळलेले नाही. पण तो दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याची निवड झालेली नाही, अशीही माहिती मिळते आहे.