हैदराबादचा क्रिकेटपटू कार्तिक मधिरा याने आपल्या कारकिर्दीलाच कलाटणी दिली आहे. क्रिकेटचे अंगभूत कौशल्य असूनही आणि यात चांगली कामगिरी करूनही त्याने क्रिकेटच्या या प्रवासाला निरोप देऊन आयपीएस अधिकारीपदाची वाट निवडली आहे.
यूपीएससी परीक्षेत अनुत्तीर्ण होऊनही त्याने चौथ्यांदा १०३वा रँक मिळवून महाराष्ट्रात आयपीएस अधिकारी होण्याची किमया केली आहे. आपले ध्येय गाठण्यासाठी कठोर मेहनत आणि चिकाटी अंगी बाळगावी लागते, हेच त्याने दाखवून दिले आहे. इंडियन पोलिस सर्व्हिसच्या प्रवासात सहभागी होण्याआधी कार्तिकने जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (जेएनटीयू)मधून कम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगची पदवी मिळवली आहे. मात्र त्याला झालेली दुखापत आणि काही वैयक्तिक कारणामुळे त्याने क्रिकेटचा मार्ग सोडला आणि सिव्हिल सर्व्हिसेसचा मार्ग पत्करण्याची त्याला उत्कट इच्छा झाली. तसेच, एके ठिकाणी केलेल्या छोट्या नोकरीमुळेही त्याला सिव्हिल सर्व्हिसेसचे करीअर खुणावू लागले.
मात्र कार्तिक यूपीएससीच्या प्राथमिक परीक्षेत तीनदा अनुत्तीर्ण झाला. मात्र या अपयशाने तो खचून गेला नाही. त्याचा आत्मविश्वास अजिबातच डगमगला नाही. त्याने सोशिओलॉजी या पर्यायी विषयावर आणखी लक्ष केंद्रित केले. त्यानंतर कार्तिकने प्रीलिम आणि मुख्य परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली. काटेकोर नियोजन, सातत्याने रिव्हिजन आणि विविध परीक्षांचा सराव यामुळे त्याने यूपीएससी परीक्षेच्या दोन्ही पायऱ्या अगदी सहजतेने गाठल्या. यूपीएससी २०१९च्या परिक्षेत चौथ्या प्रयत्नात त्याला १०३ वा रँक मिळाला.
हे ही वाचा:
इस्रायलने टिपला सिरीयात इराणचा अधिकारी
अंजू जॉर्ज म्हणते, तो काळ चुकीचा, मोदींच्या काळात खेळांची प्रगती!
अयोध्येत प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पुणेकरांचा वाजणार शंख!
सध्या कार्तिकची महाराष्ट्र कॅडेरमध्ये निवड झाल्याचे समजते आहे. कार्तिकचा यूपीएससीचा विजयी प्रवास म्हणजे सर्वसमावेशक तयारी केल्यानंतर मिळणाऱ्या यशाचे द्योतक आहे. सातत्याने अभ्यास, कठोर प्रश्नपत्रिका सोडवणे, वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित करण्यासह लेखन कौशल्य विकसित करणे… या सर्व बाबींमुळेच त्याने एक यशस्वी आयपीएस अधिकारी बनविण्यात यश मिळवले आहे.