क्रिकेट विश्वचषक २०२३ : पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या संघांना भारताचा व्हिजा

क्रिकेट विश्वचषक २०२३ : पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या संघांना भारताचा व्हिजा

भारतात होऊ घातलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी अखेर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघ तसेच, क्रू मेंबरना मंगळवारी भारताचा व्हिजा मिळाला आहे. पाकिस्तानचा संघ बुधवारी भारताच्या दिशेने प्रयाण करणार असून तो हैदराबाद येथे उतरेल. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा पहिला सराव सामना येथे रंगेल.

पाकिस्तानचा संघ दुबईमार्गे भारतात दाखल होणार आहे. बुधवारी, २७ सप्टेंबर रोजी पाकिस्तानचा संघ भारतात दाखल होईल. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ दुबईमार्गे हैदराबादला पोहोचेल. त्यानंतर शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजी त्यांचा पहिला सराव सामना रंगेल.

पाकिस्तानने १९ सप्टेंबर रोजी भारताच्या व्हिजासाठी अर्ज केला होता. मात्र पाच दिवसांनंतर त्यांचा व्हिजा मंजूर झाला. भारतात विश्वचषक स्पर्धेत खेळण्याआधी पाकिस्तानच्या संघाचे आधी दुबईत ‘टीम बॉन्डिंग कॅम्प’ घेण्याची पाकिस्तानची योजना होती. परंतु त्यांना हा बेत रद्द करावा लागला आहे. आता ते थेट भारतात येतील.

विश्वचषकाचा पहिला सामना खेळण्यापूर्वी पाकिस्तानचा संघ दोन सराव सामने खेळेल. त्यांचा विश्वचषकातील पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी नेदरलँडविरुद्ध असेल. तत्पूर्वी त्यांचा पहिला सराव सामना हैदराबाद येथे न्यूझीलंडविरुद्ध असेल. तर, दुसरा सामनाही येथेच ३ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगेल.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत जोगेश्वरीचे नगरसेवक प्रवीण शिंदे आता शिवसेनेत

काँग्रेस म्हणजे गंजलेले लोखंड!

शतकवीर श्रेयस अय्यर म्हणाला, मला एकटेपणाने ग्रासले होते!

कारमधील एअरबॅग ‘गहाळ’ केल्याप्रकरणी आनंद महिंद्रा आणि अन्य १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

पाकिस्तान आणि भारत हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकमेकांसमोर उभे ठाकतील. याच स्टेडियमवर विश्वचषक स्पर्धेचा सलामीचा सामना रंगणार आहे. सन २०१९मध्ये अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात हा सामना रंगेल. पाकिस्तान देशभरातील पाच ठिकाणी विश्वचषक स्पर्धेतील सामने खेळणार आहे. हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि बेंगळुरूमध्ये प्रत्येकी दोन तर, अहमदाबादमध्ये एक सामना रंगेल.

Exit mobile version