‘क्रिकेटचा फिवर शरीयाच्या विरोधात, तालीबान्यांकडून क्रिकेट बंदीची शक्यता’

महिलांच्या क्रिकेट टीमवर यापूर्वीच बंदी 

‘क्रिकेटचा फिवर शरीयाच्या विरोधात, तालीबान्यांकडून क्रिकेट बंदीची शक्यता’

अफगानिस्तानची क्रिकेट टीम जागतिक क्रिकेटमध्ये एक आश्वासक टीम म्हणून पुढे येत आहे. पण अफगानिस्तानमधील सत्ताधारी तालीबान्यांना याच सोयर सुतकही नाहीये. तालीबान्यांकडून क्रिकेटवर बंदी आणली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या विषयावर कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नसले तरी या बातमीने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला. अफगाणिस्तान क्रिकेट संघाने २०२४ च्या T२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती. मात्र,  उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला. अफगाणिस्तान क्रिकेट संघ उत्तम कामगिरी करताना दिसत आहे, मात्र सत्ताधारी तालिबान क्रिकेटवर बंदी घालण्याची चर्चा आहे. तसे झाल्यास क्रिकेट चाहत्यांना आणि खेळाडूंना मोठा धक्का बसू शकतो.

क्रिकेटमुळे अफगानिस्तानाचं वातावरण बिघडत असल्याचे तालीबान्यांचे मत आहे, तसेच क्रिकेटचा फिवर शरीया कायद्याच्या विरोधात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. क्रिकेटवर बंदी कधी घालणार आणि ती कशी असणार याबाबत अजूनही संभ्रम आहे. दरम्यान, तालीबान्यांनी महिलांच्या क्रिकेट टीमवर यापूर्वीच बंदी घातली आहे.

हे ही वाचा :

चंदीगड ग्रेनेड स्फोट: दिल्लीतून दुसऱ्या आरोपीला अटक !

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर डॅलसमध्ये डल्ला! हीच का काँग्रेसची लोकशाही?

विरोधक रसातळाला! मोदी गेले आरतीला चैन पडेना आम्हाला!

बीफ कटलेट आणि अपचनाचे ढेकर

 

Exit mobile version