कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवाल याची तब्येत मंगळवारी अचानक बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. रणजी सामना खेळून परतत असताना विमानामध्ये बसलेला असतानाच मयंकची तब्येत बिघडली. अग्रवाल याने इंडिगोच्या विमानात बसल्यानंतर पाणी समजून एका बाटलीतील पाणी प्यायले होते. त्यानंतर त्याचे पोट दुखू लागले. त्यानंतर त्यांना तोंडात आणि घशात जळजळ जाणवू लागली. त्यामुळे त्यांना तातडीने आगरतळा येथील खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले.
अग्रवाल हे आगरतळा येथून दिल्लीमार्गे सूरतकडे प्रयाण करत असताना मंगळवारी रात्री ही घटना घडली. शुक्रवारी सुरत येथे कर्नाटकचा सामना रेल्वेशी होणार आहे. अग्रवाल याला विमानातच उलट्या झाल्या. कर्नाटक संघाचे बाकीचे सहकारी सूरतसाठी रवाना झाले आहेत. त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी रुग्णालयातच आहेत. त्याची प्रकृती आता स्थिर असून त्याच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
हे ही वाचा:
महाविकास आघाडीत ‘वंचित’चा समावेश!
छत्रपतींचा इतिहास; मोदी, शिववडा आणि शिवथाळी…
नाशिक: इगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू!
कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’
तो पुढील २४ तास डॉक्टरांच्या निगराणीतच असेल. त्याच्या काही चाचण्या केल्यानंतर आणि एकूण परिस्थिती पाहून त्याच्यावर तेथेच उपचार करायचे की बंगळुरूला न्यायचे, यावर विचार केला जाईल. सध्या तरी तो रणजी सामन्यात खेळू शकणार नाही, हे नक्की झाले आहे.