29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरविशेषआयपीएलमध्ये चेन्नई, धोनी, गुजरातवरून चर्चेचा धुरळा

आयपीएलमध्ये चेन्नई, धोनी, गुजरातवरून चर्चेचा धुरळा

प्ले ऑफसाठी क्रिकेटरसिक सज्ज

Google News Follow

Related

इंडियन प्रीमियर लीगचा पुढील आठवडा हा अनेक रोमांचक प्रसंगांनी भरलेला असेल का याबद्दल आता उत्सुकता ताणली जात आहे. आयपीएलच्या प्ले ऑफचे सामने चेन्नईत खेळविले जाणार असून चेन्नई सुपर किंग्ज संघ प्ले ऑफमध्ये असल्याने कर्णधार महेंद्रसिंग धोनी कोणती कमाल याठिकाणी करून दाखवणार याची चर्चा सुरू झाली आहे.

एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये या लढती होत असून त्यात पहिल्या क्रमांकावर असलेला गुजरात संघ चेन्नईशी २३ मे रोजी झुंजणार आहे तर लखनऊ आणि मुंबई इंडियन्स यांच्यात दुसरा सामना २४ मे रोजी होईल. त्यात चारवेळा विजेता ठरलेल्या चेन्नईच्या ४१ वर्षीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे सगळ्यांच्या नजरा असतील.

या आयपीएलनंतर महेंद्रसिंग धोनीने निवृत्तीचे संकेत दिले आहेत त्यामुळे या स्टेडियमवर धोनीचा खेळ आणि चेन्नईची कामगिरी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक येण्याची शक्यता आहे. धोनीने २०२०मध्ये राष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. पण आयपीएलमध्ये तो खेळत आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी ८व्या क्रमांकावर फलंदाजीस येत असून त्याने स्वतःवर फलंदाजीचे फार ओझे घेतलेले नाही. या महिन्याच्या प्रारंभी दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याने ९ चेंडूंत २० धावा केल्या होत्या. तेव्हा या क्रमांकावर फलंदाजीस येताना आपली जी जबाबदारी आहे, ती आपण पार पाडत आहोत, असे तो म्हणाला होता.

धोनीच्या निवृत्तीची शक्यता असल्यामुळे आयपीएलचा अखेरचा आठवडा गाजणार आहे. गुजरातसाठी मात्र हा मोसम यशस्वी ठऱला आहे. गेल्यावर्षी त्यांनी आयपीएलमध्ये विजेतेपद मिळविले होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा प्ले ऑफमध्ये स्थान मिळविले आहे. हार्दिक पंड्याने आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. गुजरातने १० संघांमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे.

गिलचा झंझावात

गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल याच्या खात्यात ६८० धावा आहेत तर फाफ डू प्लेसिसने ७३० धावा केलेल्या आहेत. पण आता त्याला फाफ डू प्लेसिसला मागे टाकत ऑरेंज कॅप पटकाविण्याच संधी आहे. जर गुजरातला प्ले ऑफमध्ये यश मिळाले आणि तो अंतिम फेरीत पोहोचला तर अहमदाबाद येथील १ लाख ३२ हजार क्षमतेच्या स्टेडियममध्ये त्यांना कमाल दाखविता येणार आहे.

आयपीएलमध्ये रविवारचा दिवस थरारक होता. गुजरातने बेंगळुरूला सहा विकेटने पराभूत केल्यामुळे बेंगळुरूचा संघ आयपीएलमधून बाहेर फेकला गेला. मात्र या पराभवामुळे मुंबईचा संघ अव्वल चार संघांत पोहोचला.

हे ही वाचा:

भुयारी मार्गात तुंबलेल्या पाण्यात गाडी अडकली; इन्फोसिसच्या इंजीनियरचा मृत्यू

फुटबॉल स्टेडियममध्ये चेंगराचेंगरीमुळे गेला १२ जणांचा जीव

‘पापुआ न्यू गिनी’च्या पंतप्रधानांनी मोदींच्या पायाला केला स्पर्श!

…म्हणून जी-२० पाहुणे यापुढे गुलमर्गला जाणार नाहीत!

 

आयपीएलचा करंडक पटकावण्याचे बेंगळुरूचे स्वप्न पुन्हा धुळीस मिळाले. २१ मे रोजी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात गुजरातने बेंगळुरूचा सहा विकेटने पराभव केला. गुजरातला विजयासाठी १९८ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. बंगळुरूच्या पराभवामुळे अव्वल चारमध्ये पोहोचणाऱ्या संघामध्ये मुंबईने जागा पटकावली आहे. गुजरातच्या विजयाचे शिल्पकार सलामीचा फलंदाज शुभमन गिल ठरला. त्याने ५२ चेंडूमध्ये १०४ धावा तडकावल्या. त्याने पाच चौकार आणि आठ षटकार फटकावले. गिलच्या या अफाट कामगिरीमुळे विराट कोहलीच्या श्रमावर पाणी फेरले. कोहलीने बंगळुरूसाठी नाबाद १०१ धावांची खेळी केली होती.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा