या ‘कल्पनाशक्ती’ला दाद द्यावी तेवढी कमी!

या ‘कल्पनाशक्ती’ला दाद द्यावी तेवढी कमी!

सोशल मीडियावर कायम लक्ष ठेवून असलेल्यांची प्रतिभेला कायम बहर येत असतो. नवी मालिका, नवा चित्रपट, नवा कलाकार चर्चेत आला रे आला की, प्रतिभेचा आविष्कार पाहायला मिळतो. सध्या वेगवेगळ्या म्हणी, वाक्प्रचारांवरून मिम्स बनविण्याचा सपाटा सुरू झाला आहे. अशा या अनोख्या ‘कल्पनाशक्ती’ला खरोखरच दाद द्यावी लागेल. कल्पना अय्यर आणि शक्ती कपूर यांच्या एका चित्रपटातील फोटोवरून या ‘कल्पनाशक्ती’चा अंदाज नक्कीच येईल.

‘बुचकळ्यात पडणे’ या वाक्प्रचारावर तयार केलेले मिम मध्यंतरी प्रचंड गाजले. त्यात मोगऱ्याच्या कळ्यांमध्ये ते बूच दाखविण्यात आले आहे. त्याला बूच कळ्यात पडणे असे समर्पक शीर्षक देऊन या वाक्प्रचाराला गमतीदार केले आहे. आता लोकांच्या अशाच क्रिएटिव्हिटिची सातत्याने भर पडू लागली आहे.

 

हे ही वाचा:

गाडी पुण्यात; दंड मुंबईत!

सिरीया, इराकमधून आलेल्या शेजाऱ्यांनी त्याला बनवले अतिरेकी

लोकप्रिय कलाकार घेतायत ८० हजार ते दीड लाख रोज

गर्भवती महिलेला तालिबान्यांनी कुटुंबासमोर घातल्या गोळ्या

प्राण कंठाशी येणे हा वाक्प्रचार चांगलाच गाजतो आहे. प्रसिद्ध अभिनेते दिवंगत प्राण आणि शशी कपूर यांची गळाभेट दाखविणाऱ्या एका फोटोवर कंठाशी प्राण येणे हा वाक्प्रचार लिहिण्यात आला आहे. हा फोटो पाहिल्यावर आपोआपच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमटते. अंगाची लाही लाही होणे, द्राविडी प्राणायाम, उचलबांगडी, वर्मावर घाव घालणे, कानात बोट घालणे, पॉकेटमनी, ताकास तूर लागू न देणे, ओलीस धरणे, कानाखाली वाजवणे अशा अनेक मिम्समधून आता ही प्रतिभा ओसंडून वाहू लागली आहे. यानंतरही अशा मिम्सची चलती काही दिवस राहील. त्यात विविध अवयवांवरून असलेले वाक्प्रचार, म्हणी यांचा वापर करून कल्पनाशक्तीला वाव दिला जाण्याची शक्यता आहे.

 

Exit mobile version