कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी “भारतविरोधी खलिस्तानींना” पाठिंबा दिल्यास कॅनडाचा काही भाग तोडून नवा खलिस्तानी देश निर्माण करावा असेयुनायटेड हिंदू फ्रंटकडून सांगण्यात आले आहे.युनायटेड हिंदू फ्रंटने रविवारी जस्टिन ट्रुडो यांच्या विरोधात दिल्लीच्या जंतर मंतर येथे निदर्शने केली,यामध्ये कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतविरोधी खलिस्तानींना दिलेल्या संरक्षणबद्दल आंदोलकांनी रोष व्यक्त करत निषेध केला आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरप्रीतसिंग निज्जर याच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर भारत आणि कॅनडामधील संबंध चिघळले आहेत. निज्जर याच्या हत्येत भारत सरकारच्या एजंटचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता.जस्टिन ट्रुडो यांचे आरोप हे केवळ हास्यास्पद अन बिनबुडाचे असल्याचे सांगत भारताने हे आरोप फेटाळून लावले आहे. जस्टिन ट्रुडो यांच्या आरोपावर पश्चिमी देशांनी सुद्धा समर्थन केले नाही, तर त्यांनी चिंता व्यक्त करत आरोपीस शिक्षा व्हावी असे सूचित केले.भारत आणि कॅनडामधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वंशाचे सरबजीत सिंग मारवाह यांनी देखील कॅनडाच्या सिनेटचा राजीनामा दिला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांची सिनेटवर नियुक्ती केली होती.यानंतर आता जस्टिन ट्रुडो यांच्या विरोधात युनायटेड हिंदू फ्रंटने दिल्लीतील जंतर-मंतर येथे निदर्शने करत घोषणाबाजी केली.युनायटेड हिंदू फ्रंटने सुचवले की, जर ट्रूडो खलिस्तानींना इतकेच समर्थन देत असतील तर त्यांनी कॅनडात एक नवीन खलिस्तान देश निर्माण करण्याचा विचार करावा.
“जर कॅनडाच्या पंतप्रधानांचे खलिस्तानींवर इतके प्रेम आहे, तर ते कॅनडाचा एक भाग तोडून नवीन खलिस्तानी देश का निर्माण करत नाहीत? आम्ही त्यांना सर्वप्रथम मान्यता देऊ,” असे संयुक्त हिंदू आघाडीचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष जय भगवान गोयल म्हणाले. खलिस्तानवाद्यांमधील प्रमुख व्यक्ती गुरपतवंत सिंग पन्नून याला भारताकडे सोपवण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी केली.
हे ही वाचा:
भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध केल्याबद्दल ‘मोटोजीपी’कडून माफी
खलिस्तानी दहशतवादी निज्जरचे पंजाबमधील घर जप्त होणार
हरदीपसिंग निज्जर कॅनडात दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र चालवायचा!
आईच्या मृत्यूनंतरही पोलिसाने कर्तव्य निभावले; पंतप्रधान झाले भावूक
अमेरिकेत दी घातलेल्या शीख फॉर जस्टिस (SFJ) संघटनेचे प्रमुख पन्नून याने १० सप्टेंबर रोजी कॅनडातील मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांना धमक्या दिल्या होत्या.
गोयल यांनी सांगितले की सरकारकडून वारंवार निषेध करूनही, खलिस्तानींवर ट्रूडोची भूमिका कायम असल्याचे त्यानी सांगितले.गोयल भर देत म्हणाले, G-२० शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतरही ट्रूडो कॅनडाला परतल्यावर खलिस्तानींना पाठिंबा देत राहिल्याचे त्यांनी नमूद केले.
ट्रुडो यांनी खलिस्तानींना संरक्षण देत राहिल्यास, कॅनडाच्या विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना परत बोलावू आणि भविष्यात कॅनडात उच्च शिक्षण घेण्यापासून विद्यार्थ्यांना रोखण्याचं काम आम्ही करू, असे गोयल यांनी सांगत इशारा दिला.
दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची लोकप्रियता कमी होत असल्याचे दिसून आले आहे.इप्सॉसकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दिसून आले.इप्सॉसच्या सर्वेक्षणानुसार जर आज निवडणूका झाल्या तर जस्टिन ट्रुडो याना ३० टक्के मत मिळू शकतील व कॅनेडियन विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे याना ४० टक्के मत मिळेल असे सर्वेक्षणात म्हटले आहे.त्यामुळे पॉइलीव्हर याना लोकांची पसंती असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे.