१०० वर्षे जुन्या मुंबईच्या प्रवेशद्वाराला ‘तडे’

डोममधील वॉटरप्रूफिंग आणि सिमेंट काँक्रीटचेही नुकसान

१०० वर्षे जुन्या मुंबईच्या प्रवेशद्वाराला ‘तडे’

मुंबईचे ताजमहाल म्हणून ओळखले जाणाऱ्या मुंबईच्या प्रवेशद्वाराला तडे गेल्याचे समोर आले आहे. वर्षानुवर्ष समुद्राच्या अथांग लाटा आणि अनेक वादळे झेलणाऱ्या मुंबईतील ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडियासंबंधित ही चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

शंभर वर्ष जुना ऐतिहासिक वारसा असलेल्या गेटवेच्या डोमच्या आतील भागाला तडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. ही वास्तू शंभर वर्षांपेक्षा इतकी जुनी आहे. मुंबईत पाहुणे आले की आजही गेटवे पाहिल्याशिवाय त्याची मुंबईवारी पूर्ण होत नाही. ११३ वर्षांपासून मोठ्या जिमाखात समुद्राच्या लाटा आणि वादळांचा सामना करत ही वास्तू समुद्राच्या काठावर मोठ्या दिमाखात उभी आहे.

गेट वे ऑफ इंडिया वास्तूशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. १९११ सालही ही वास्तू १९२४ मध्ये लोकांसाठी खुली करण्यात आली. गेटवेचं नुकतेच स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्याच ऑडिट रिपोर्टनुसार गेटवेच्या समोरील भागाला भेग्या गेल्याचे दिसले. अनेक ठिकाणी वनस्पतीही वाढल्याचे दिसले. डोममधील वॉटरप्रूफिंग आणि सिमेंट काँक्रीटचे देखील नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा :

भारत ऑस्ट्रेलिया मैदानात आमनेसामने, मैदानाबाहेर दोस्ती

‘पाकिस्तानने चिथावणी दिली तर त्यांचे काही खरे नाही…भारत देणार चोख उत्तर

संजय राऊत भ्रमिष्ट झालेत, त्यांना तात्काळ मानसोपचारतज्ज्ञाकडे न्या!

त्यानंतर राज्याच्या पुरातत्व आणि वास्तुसंग्रहालय संचालनालयाने ६.९  कोटींचा जीर्णोध्दारासाठीचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला. त्यानंतर पुरातत्व विभागाने  ६,९ कोटींचा संवर्धनाचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे. त्यानंतर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेट वे ऑफ इंडियासाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन दिलंs आहे. स्वातंत्र्यानंतर ब्रिटीश साम्राज्याच्या शेवटच्या सैनिकांनी भारत सोडला तेव्हा ते या वास्तूतून गेले होते. त्यानंतर भारतातील ब्रिटीश साम्राज्याचे वर्चस्व संपुष्टात आलं होतं. भारताचं प्रवेशद्वारे समजल्या जाणाऱ्या ह्या शहरानं ही वास्तू जपली आहे.

गेटवे ऑफ इंडियाबद्दल हे तुम्हाला माहित आहे का?

  1. इंग्लंडचा राजा पाचवा जाॅर्ज यांच्या भेटीस्मरणार्थ हे प्रवेशद्वार उभारलं गेलं होतं.
  2. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटीश सैन्य या गेटवे ऑफ इंडियाद्वारे आपल्या देशात परत गेले.
  3. गेटवे ऑफ इंडिया बांधण्यासाठी एकूण २१ लाख खर्च आला.
  4. गेटवे ऑफ इंडिया बांधण्याचा एकूण खर्च भारत सरकारने उचलला होता.
Exit mobile version