छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडे गेल्यावरून आरोप प्रत्यारोप

महाराजांच्या पुतळ्याविषयी खोट्या बातम्या पसरवू नका, आयुक्तांचे आवाहन

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडे गेल्यावरून आरोप प्रत्यारोप

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेप्रकरणी राज्यात संतापाची लाट असताना छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तयार होण्याआधीच पायाला तडे गेल्याचे सांगितले जातंय. मात्र, पुतळ्याला तडे गेल्याच्या व्हायरल झालेल्या फोटो-व्हिडीओवर पिंपरी पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी प्रतिक्रया देत, व्हायरल झालेले फोटो साईटवरील नसून शिल्पकार राम सुतार यांच्या गोडाऊनमधील असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता यावरून आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचा १०० फुटी पुतळा उभारला जात आहे. महापालिकेकडून यासाठी एकूण ४७ कोटी रुपये इतका खर्च करत आहे. दिल्लीमध्ये पुतळ्याची निर्मिती होवून त्याचे पार्ट पिंपरी-चिंचवडमध्ये आणले जात आहेत. महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी २०२५ उजाडेल असे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा एका पायाला तडा गेल्याचे म्हटले जात आहे. सोशल मिडीयावर याचे फोटो-व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. त्यामुळे पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे का?, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकरणावर पिंपरी पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी प्रतिक्रया दिली आहे.

हे ही वाचा : 

प. बंगालमध्ये बलात्कार विरोधी ‘अपराजिता’ विधेयक एकमताने मंजूर

इस्लामिक सेंटर हॅम्बर्गचा माजी प्रमुख जर्मनीमधून हद्दपार

बांगलादेशात रस्त्यात घर बांधून हिंदूंची केली कोंडी !

ती सुरतेची लूट नव्हती…पंतप्रधान मोदींचे ते भाषण व्हायरल!

आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्या संबंधित बातम्या, फोटो जे काही व्हायरल होत आहे, ते पुतळ्याच्या साईटवरील नसून शिल्पकार राम सुतार यांच्या फैब्रीकेशनच्या शेडमधील असलेल्या पुतळ्याचे काही फोटो घेवून व्हायरल केले जात आहेत. हे मी एक नुकसान कारक असल्याचे म्हणेल, त्याच्यामध्ये काही अतिशयोक्ती होणार नाही. हा संवेदनशील विषय असून कोणत्याही खऱ्या माहितीशिवाय लोकांनी विश्वास ठेवू नये. तसेच छत्रपती  संभाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी खोट्या बातम्या पसरवू नका, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला खरंच तडा गेलाय का? असा प्रश्न निर्माण होत असून याबाबत खरी माहिती समोर आल्यावरच सर्व उघड होईल.

Exit mobile version