माकप नेते सीताराम येचुरी यांचे निधन

वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

माकप नेते सीताराम येचुरी यांचे निधन

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) नेते सीताराम येचुरी यांचे निधन झालं आहे. सीताराम येचुरी हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. वयाच्या ७२ व्या वर्षी सीताराम येचुरी यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र, गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. श्वसन मार्गात जंतूसंसर्ग झाल्यामुळे त्यांना १९ ऑगस्ट रोजी पासून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. या दरम्यान आज दुपारी त्यांचं निधन झालं.

सीताराम येचुरी हे भारताच्या डाव्या विचारप्रवाहातील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या नेतृत्वाखाली वंचित, कामगार आणि मागास वर्गाच्या हक्कांसाठीची अनेक आंदोलनं झाली होती. सीताराम येचुरी यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५२ साली चेन्नईत एका तेलुगू भाषिक ब्राह्मण परिवारात झाला होता. येचुरी यांनी नवी दिल्लीच्या प्रेसिडेंट्स एस्टेट स्कुलमध्ये शिक्षण घेतलं होतं. तसेच त्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या उच्च माध्यमिक परीक्षेत भारतात पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषयाच बीएचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर दिल्लीतील जेएनयू येथे एमए अर्थशास्त्रचं शिक्षण घेतलं होतं.

हे ही वाचा..

मशिदीचा अनधिकृत भाग सांगा आम्हीच काढून घेतो

धर्मांतरप्रकरणी मौलाना कलीम सिद्दीकी, मोहम्मद उमर गौतमसह १२ जणांना जन्मठेप

चार लाखांच्या सोनसाखळीसोबत बाप्पाच्या मूर्तीचं केलं विसर्जन आणि…

इस्लामच्या नावे चालत होते चैरिटी होम्स, देत होते बलात्काराची ट्रेनिंग, ४०० मुलांचा बचाव !

सीताराम येचुरी यांनी १९७४ साली स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआयमध्ये प्रवेश केला. एका वर्षातच ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यदेखील झाले. १९७५ साली जेएनयूमध्ये असतानाच त्यांना आणीबाणीच्या काळात अटक झाली. १९७७-७८मध्ये ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही निवडून आले होते. २०१५ साली ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव म्हणून नियुक्त झाले. यादरम्यान त्यांनी तब्बल १२ वर्षं राज्यसभेत खासदार म्हणून काम केलं.

Exit mobile version