28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
घरविशेषसी.पी.राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची घेतली शपथ !

सी.पी.राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची घेतली शपथ !

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी दिली शपथ

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी आज (३१ जुलै) राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये हा समारंभ पार पडला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. राज्यपालांच्या पत्नी श्रीमती सुमथी आर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मंत्रिमंडळ सदस्य, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, राज्यपाल राधाकृष्णन यांचे कुटुंबीय आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यपालांच्या नियुक्तीबाबतचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आदेश वाचून दाखवला. शपथ सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.

हे ही वाचा:

वायनाड दुर्घटनेवर अमित शहा म्हणाले, ‘इशारा देऊन देखील केरळ सरकारचे दुर्लक्ष’

अमर, अकबर आणि तिसरी आघाडी…

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राचा ५० मीटर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

टेबल टेनिसपटू श्रीजाचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय महिला खेळाडू !

दरम्यान, राधाकृष्णन यांनी १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या होत्या. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीतही भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती, तरीही त्यांचा पराभव झाला होता. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रपतींनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा