33 C
Mumbai
Friday, November 8, 2024
घरविशेष‘ड्रेनेजचं झाकण ‘त्या’ गायीनेचं बाजूला केलं आणि पडली’

‘ड्रेनेजचं झाकण ‘त्या’ गायीनेचं बाजूला केलं आणि पडली’

Google News Follow

Related

मुंबई महानगरपालिकेचा अजब दावा

मुंबईतील दादरमध्ये एका ड्रेनेजच्या टाकीत सोमवारी, २७ मार्च रोजी सकाळी एक गाय पडल्याची घटना घडली होती. संबंधित घटनेची माहिती मिळताच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर अथक प्रयत्नांनंतर गायीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. मात्र, या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर पालिकेने अजब निष्कर्ष समोर मांडला आहे.

या संपूर्ण घटनेची मुंबई पालिकेच्या घनकचरा विभागाकडून चौकशी करण्यात आली. ड्रेनेज टाकीचे झाकण बाजूला कसे सरकले आणि गाय आत कशी पडली याची चौकशी करण्यात आली. मात्र, या नंतर पालिकेने अजबच निष्कर्ष मांडला. गायीने पायाच्या खुराने चेंबरवरील झाकण खोरले. त्यानंतर झाकण सरकले आणि गाय त्यात पडली, असा हास्यास्पद निष्कर्ष पालिकेने काढला.

पालिकेच्या या अजब अहवालानंतर भाजपा आमदार राम कदम यांनी मुंबई पालिकेवर निशाणा साधला आहे. “गाय जर ड्रेनेज टाकीवरचे झाकण बाजूला सारू शकते तर नक्कीच या झाकणांमध्येही काहीतरी घोटाळा झाला असेल,” असा टोला त्यांनी मुंबई महापालिकेला लगावला आहे.

हे ही वाचा:

‘शरद पवारांचं आडनाव बदलून आगलावे ठेवा’

कोरोना काळात विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार

‘हिंदू सणांना परवानगी देताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा मारतो का?’

नुकतेच लग्न झालेल्या कबड्डीपटूचा खून

दादर भागात शंकर रोडवरील कबुतरखाना परिसरात सोमवारी सकाळी गाय ड्रेनेज टाकीत पडली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि पालिकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. ड्रेनेज टाकीच्या बाजूचा भाग खोदून अथक प्रयत्नांनंतर गायीला बाहेर काढण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
188,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा