कोविड लशीमुळे अतिशय दुर्मीळ प्रकरणांमध्ये, रक्तामध्ये गुठळ्या होण्याशी संबंधित दुष्परिणाम होऊ शकतो, अशी कबुली ब्रिटनमध्ये मुख्यालय असलेली, औषधनिर्माण उद्योगातील बडी कंपनी ऍस्ट्राझेनेकाने (एझेड) ब्रिटनच्या न्यायालयात दिली आहे. मात्र हे दुष्परिणाम नेमक्या कोणत्या कारणामुळे होऊ शकतात, हे सांगता येत नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
शिवाय, या लशीमुळे टीटीएस म्हणजे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमसह थ्रोम्बोसिस (टीटीएस) होऊ शकतो, असे कंपनीने कबूल केले आहे. कंपनीविरोधात लशीमुळे झालेल्या दुखापती अथवा मृत्युमुळे ब्रिटनमधील ५१ दावेदारांनी खटला दाखल केला आहे. यापैकी १२ जणांच्या नातेवाइकांचा लस घेतल्यानंतर मृत्यू झाला आहे. या कंपनीची लस कोव्हिशील्ड नावाने भारतात देण्यात आली होती.
याबाबत ‘इंडिया टुडे’ने काही डॉक्टरांशी चर्चा करून या लशीचे भारतीयांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतील का, असे विचारले. ‘लशीचे दुष्परिणाम शक्यतो लस घेतल्यानंतर एक ते सहा आठवड्यांदरम्यान घ्यावे लागतात. भारतीयांनी ही लस दोन वर्षांपूर्वी घेतली असल्याने त्यांना काळजीचे कारण नाही,’ असे हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलचे न्युरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितले.
हे ही वाचा:
टीएमसीला मतदान करण्यापेक्षा भाजपला करा!
अतिक अहमद, शहाबुद्दीन आणि मुख्तार अन्सारी यांच्या नावाने मते !
‘न्यूजक्लिकच्या संस्थापकाकडून दहशतवादी गटांना आर्थिक मदत’
‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली यांचा भाजपात प्रवेश!
तर, समोर आलेले हे दुष्परिणाम हे पहिला डोस घेतल्यानंतर पहिल्याच महिन्यात दिसून आले आहेत, त्यानंतर नाही, याकडे नॅशनल मेडिकल असोसिएशनचे को-चेअरमन डॉ. राजीव जयदेवन यांनी लक्ष वेधले. भारतात लस घेतल्यानंतर टीटीएस घेतल्याचे उदाहरण समोर आलेले नाही, असेही डॉ. कुमार म्हणाले.
‘अतिशय दुर्मिळ बाबतीत हे समोर आले आहे. कोव्हिड लशीमुळे टीटीपी झाल्याची ही अतिदुर्मिळ घटना आहे,’असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. करोनामुळे रक्ताच्या गुठळ्या, हृदयविकाराचा झटका येण्याची भीती असते, मात्र लस घेतलेल्या व्यक्तींना हा धोका कमी असतो, याकडे डॉ. जयदेवन यांनी लक्ष वेधले.