‘या’ सहा राज्यातून येणाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य

‘या’ सहा राज्यातून येणाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहा राज्यांना कोविड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक असणार आहे. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कोविड संदर्भातील नियमाचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नुकतंच राज्य सरकारकडून रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी ब्रेक द चैन अंतर्गत नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि एनसीआर, उत्तराखंड या सहा राज्यांना कोव्हिड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यानुसार या सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना ४८ तास आधी कोरोना चाचणी अनिर्वाय असणार आहे. तसेच या कोव्हिड चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणाऱ्यांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे, असे यात म्हटलं आहे.

हे ही वाचा:

मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदींना पत्रातून काय लिहिले?

कोरोना आणि निवडणुकांचा काहीही संबंध नाही

मोदी सरकारकडून ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ सुरु

कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल

तसेच या सहा राज्यातून केवळ आरक्षित असलेल्या प्रवाशांना गाड्यांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच प्रवास करणाऱ्या प्रवाशाला कोरोनासदृश कोणतीही लक्षणं आहे की नाही, याची खात्री करुनच परवानगी दिली जाणार आहे. त्याशिवाय रेल्वे प्रशासनाने या राज्यातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे गाड्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला द्यावी, असेही यात नमूद करण्यात आले आहे. तसेच अनेकदा लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये कोविड संदर्भातील सर्व नियमाचं पालन करावं, अशी सूचनाही यावेळी देण्यात आली आहे.

Exit mobile version