सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

देशभरात कोरोना वेगाने वाढत आहे. आता कोरोनाने सर्वोच्च न्यायालयावर देखील धडक मारली आहे. सुमारे ५० टक्के कर्मचारी कोरोनाबाधित निघाल्याने सर्वोच्च न्यायालयाने दूरस्थ प्रणाली द्वारे आभासी (व्हर्च्युअल) सुनावणी घ्यायला सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यामुळे न्यायालयाने व्हर्च्युअल सुनावणींना सुरूवात केली आहे. त्याबरोबरच न्यायालयाचा संपूर्ण परिसर, न्यायालये इत्यादी सगळ्या सॅनिटाईझ करण्यात येत आहेत.

हे ही वाचा:

भाजपाचे माजी आमदार पास्कल धानारे यांचे कोरोनामुळे निधन

गरज अकार्यक्षमतेला लस टोचण्याची!

कोवीड लसीच्या साठेबाजी प्रकरणी राजेश टोपेंना नोटीस

त्याबरोबरच न्यायालयाचे सर्व न्यायमुर्ती त्यांच्या ठरलेल्या वेळेच्या एक तास उशिरा कामाला सुरूवात केली. त्यामुळे जे खंडपीठ १०.३० ला चालू होणार होते ते ११.३० ला चालू झाले.

या घटनेपुर्वी सरन्यायाधीश न्यायमुर्ती शरद बोबडे, न्यायमुर्ती एन व्ही रामण्णा, आर एफ नरिमन, यु यु ललित, ए एम खानविलकर, अशोक भूषण, एल एन राव, एस ए नाझिर, नविन सिन्हा हे न्यायधीश प्रत्यक्ष सुनावणी घेत होते. मात्र न्यायालयातील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याने काळजी घेण्यास सुरूवात केली होती. मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयातील सुमारे सहा न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मोठ्या प्रमाणात तांत्रिक तयारी केलेली असल्याने व्हर्च्युअल सुनावणीतही अडचण येणार नसल्याचे कळले आहे.

Exit mobile version